द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी वाईनचा निर्णय घेतला – हसन मुश्रीफ
चंद्रकात पाटील वस्तुस्थितीवर आधारीत बोलत नाहीत. शिवसेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्याने राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही.
मुंबई: “चंद्रकात पाटील वस्तुस्थितीवर आधारीत बोलत नाहीत. शिवसेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्याने राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही. याआधी राष्ट्रवादीने काँग्रेसच्या आणि काँग्रेसने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रवेश दिला आहे” असे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. “वाईनच्या विषयावर मंत्रीमंडळापुढे सखोल चर्चा झाली. आपल्याकडे द्राक्ष पिकवणारा जो प्रदेश आहे, तिथल्या शेतकऱ्यांना वाईनमुळे चार चांगले पैसे मिळू शकतात. म्हणून हा निर्णय घेतला” असे मुश्रीफ यांनी सांगितले.
Latest Videos