वाईन कंपनीत शेअर्स कुणाचे त्याची चौकशी आधी कराः अतुल भातखळकर

वाईन कंपनीत शेअर्स कुणाचे त्याची चौकशी आधी कराः अतुल भातखळकर

| Updated on: Jan 30, 2022 | 7:47 PM

सुपरमार्केटमध्ये वाईन आणण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. वाईन सुपरमार्केटमध्ये ठेवण्याचा निर्णय का घेण्यात आला आहे त्याची चौकशी केली तर समजेल की, हा निर्णय का घेतला आहे. त्यामुळे वाईन इंपोर्ट करणाऱ्या कंपनीत शेअर्श कुणाचे आहेत याची चौकशी करावी अन्यथाईडी आणि सीबीआयमार्फत त्याची चौकशी करावी.

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या दोन्ही मुलींची वाईन (Wine) इंपोर्ट (Import) करणाऱ्या कंपन्यांमध्ये शेअर्स आहेत. त्यामुळे केवळ आपल्याच मुलींना फायदा व्हावा यासाठी वाईन सुपरमार्केटमध्ये ठेवण्याचे काम केले आहे.याला भ्रष्टाचाराचा वास येतो आहे. त्यामुळे सरकारने घेतलेला निर्णय आणि संजय राऊत यांच्या मुलींच्या वाईन कंपनीमध्ये असलेले शेअर्सची चौकशी करावी अन्यथा आम्ही ईडी आ सीबीआयतर्फे चौकशी करण्याची मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.