Special Report | शिवसेनेने शब्द पाळला, उत्पल पर्रीकरांविरोधातील उमेदवारी मागे, भाजपचं टेन्शन वाढलं
जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतशे गोव्याच्या (Goa Elections 2022) राजकारणात नवीन ट्विस्ट येत आहेत. आधी उत्पल पर्रीकरांच्या (Utpal Parrikar) बंडानं भाजपचं टेन्शन वाढवलं आणी आता शिवसेनेने उमेदवार मागे घेतल्याने उत्पल पर्रीकरांना आणखी बळ मिळणार आहे.
पणजी : जसजशी निवडणूक जवळ येईल तसतशे गोव्याच्या (Goa Elections 2022) राजकारणात नवीन ट्विस्ट येत आहेत. आधी उत्पल पर्रीकरांच्या (Utpal Parrikar) बंडानं भाजपचं टेन्शन वाढवलं आणी आता शिवसेनेने उमेदवार मागे घेतल्याने उत्पल पर्रीकरांना आणखी बळ मिळणार आहे. शिवसेने हा डाव भाजपला चेकमेट देण्यासाठी जरी टाकला असला तरी याचा फायदा उत्पल पर्रीकरांना होणार एवढं मात्र निश्चित. दिवंगत नेते मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्यावर प्रेम करणारा वर्गही पणजीत मोठा आहे आणि त्यांच्या मुलालाच भाजपाने पणजीतून तिकीट डावलल्याने त्याचाही परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत सतत उत्पल पर्रीकरांच्या तिकीटावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत होते, उत्पल पर्रीकरांनी ठाम राहवं त्यांनी निर्णय बदलू नये, असे सल्लेही राऊत देताना दिसून आले.
Published on: Jan 31, 2022 11:25 PM
Latest Videos