ग्राहक म्हणून आला अन् महिलेच्या मंगळसूत्रावर मारला डल्ला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

| Updated on: May 01, 2022 | 9:26 AM

कपड्याच्या दुकानात आलेल्या चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र लांबविल्याची घटना बदलापूरमधून समोर आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

महिलेला बोलण्याच्या नादात गुंतवूण तिचे मंगळसुत्र हातोहात लांबवण्यात आल्याची धक्कादायक घटना बदलापूरमधून समोर आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाला आहे. एका कपड्याच्या दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या चोरट्याने ही चोरी केली आहे. इंदू उतेकर असे मंगळसूत्र चोरी झालेल्या महिलेचे नाव आहे. इंदू उतेकर या कपड्याच्या दुकानात एकट्याच होत्या यावेळी एक व्यक्ती कपडे खरेदी करण्यासाठी आला, त्याचवेळी त्याने इंदू यांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची तारीफ केली. आपण सराफा व्यापारी असल्याचे त्यांना सांगितले, इंदू यांनी गळ्यातील मंगळसूत्र काढून संबंधित व्यक्तीला पहाण्यासाठी दिले, मात्र त्याने संधीचा फयदा घेत दुकानातून पळ काढला हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

 

Video : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन
आज औरंगाबादेत राज ठाकरेंची सभा