RPF जवानाने वाचवले महिलेचे प्राण, Sikandrabad रेल्वे स्टेशनवरचा थरारक व्हिडीओ
महिला धावत ती ट्रेन पकडायचा प्रयत्न करते आणि पकडतेही. पण तेवढ्यात तिचा तोल जातो. पाय घसरतो आणि ती खाली पडते. तिथे उपस्थित आरपीएफ कॉन्स्टेबल तातडीने तिथे धाव घेत महिलेला प्लॅटफॉर्मच्या दिशेने खेचताना दिसत आहे.
सिकंदराबाद : तेलंगणाच्या सिकंदराबाद स्टेशनवरची ही घटना आहे. स्टेशनवर लावलेल्या CCTV कॅमेऱ्यामुळे ती समोर आली. या व्हिडिओमध्ये दिसतं की एक महिला प्लॅटफॉर्मवरून चालत आहे. तेवढ्यात ट्रेन स्टेशनवरून सुटते. महिला धावत ती ट्रेन पकडायचा प्रयत्न करते आणि पकडतेही. पण तेवढ्यात तिचा तोल जातो. पाय घसरतो आणि ती खाली पडते. तिथे उपस्थित आरपीएफ कॉन्स्टेबल तातडीने तिथे धाव घेत महिलेला प्लॅटफॉर्मच्या दिशेने खेचताना दिसत आहे.
Latest Videos