Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, सरकार लागले कामाला, ‘या’ पाच प्रकारच्या बहिणींना आता…
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जांची तपासणी होणार असल्याने काही महिलांच्या मनात धाकधूक निर्माण झाली आहे. अशातच महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे.
लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हफ्ता कधी येणार याकडे साऱ्याच लाडक्या बहिणींचे लक्ष लागले असताना हिवाळी अधिवेशन होताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा कऱण्यात येणार असल्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्याप्रमाणे लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्यात येत आहे. अशातच आता लाभार्थी महिलांच्या अर्जांची तपासणी होणार असल्याने काही महिलांच्या मनात धाकधूक निर्माण झाली आहे. अशातच महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे. लाडक्या बहिणींच्या फॉर्मची सरसकट स्क्रुटनी होणार नाही, असे अदिती तटकरे यांनी म्हटले आहे. काही तक्रारी आल्या आहेत त्यांच अर्जांची स्क्रुटनी करण्यात येणार असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत 5 प्रकारच्या तक्रारी महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या फॉर्मची सरसकट स्क्रुटनी होणार नसून वेगवेगळ्या अँगलने स्क्रूटीनी होणार असल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.
काही तक्रारी स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झाल्या आहे तर काही लाभार्थी महिलांनी पत्र लिहून योजनेसाठी आता पात्र नसल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे ताक्रारी प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी होणार आहे. मूळ GR मध्ये कोणतेही बदल होणार नसल्याचे देखील अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे.
‘या’ पाच प्रकारच्या बहिणींच्या अर्जांची होणार स्क्रुटिनी
1) ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तरी योजनेचा फायदा घेत आहे अशा अर्जांची होणार स्क्रुटिनी
2) चार चाकी वाहन असलेल्या अर्जांची होणार पडताळणी
3) एकच महिलेने दोन अर्ज दाखल केले आहेत अशा अर्जांची होणार स्कुटीनी
4) लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या अर्जांची होणार पडताळणी
5) आधार कार्डवर आणि कागद पत्रावर नावांमध्ये तफावत असलेल्या अर्जाची पडताळणी होणार