विजयकुमार गावित यांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे अडचणी वाढणार? महिला आयोग काय करणार कडक कारवाई?
VIDEO | राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या अडचणी वाढणार? राज्य महिला आयोग मोठं पाऊल उचलणार? महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काय दिली महत्त्वाची माहिती?
पुणे, २२ ऑगस्ट २०२३ | आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता आहे. कारण विजयकुमार गावित यांच्या वक्तव्याची गंभीर दखल महिला आयोगाकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे आता महिला आयोग विजयकुमार गावित यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. विजयकुमार गावित यांच्याकडून तीन दिवसात नोटिशीचा खुलासा आल्यावर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. विजयकुमार गावित यांनी सार्वजनिक कार्यक्रमात काही गोष्टी सांगत असताना जो उल्लेख त्यांनी केला ते पाहता, त्यांचं वक्तव्य निश्चितच महिलांचं अपमान करणारं आहे. त्यांच्या वक्तव्यावरुन राज्य महिला आयोगात काही तक्रारी प्राप्त झाल्या. त्याची दखल घेत राज्य महिला आयोगाने विजयकुमार गावित यांना नोटीस पाठवली आहे. यामध्ये त्यांना तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.