Santosh Deshmukh Case : कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...

Santosh Deshmukh Case : कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्…

| Updated on: Jan 15, 2025 | 5:45 PM

वाल्मिक कराडचं गाव असलेल्या पांगरी या गावात महिलांनी थेट रस्त्यावर उतरत वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू केलं आहे. वाल्मिक कराडच्या गावात महिला आक्रमक होत महिला थेट रस्त्यावर झोपल्याचे पाहायला मिळत आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर काल परळीमध्ये बंदची हाक देण्यात आली. इतकंच नाहीतर वाल्मिक कराडचे समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, आज कोर्टाकडून वाल्मिक कराडला ७ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली. सीआयडी कोठडी सुनावण्यात आल्यानंतर आरोपी वाल्मिक कराड याला पोलीस व्हॅनमधून जेलच्या दिशेला घेऊन जाण्यात आलं. मात्र पोलीस कराडला व्हॅनमधून घेऊन जात असताना कोर्टाबाहेर एकच गोंधळ पाहायला मिळाला. तर दुसरीकडे वाल्मिक कराडचं गाव असलेल्या पांगरी या गावात महिलांनी थेट रस्त्यावर उतरत वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू केलं आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावण्यापूर्वी परळी पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराडच्या आईने आपल्या मुलाला अडकवलं जातंय असं म्हणत ठिय्या आंदोलन केलं होते. तर आज वाल्मिक कराडच्या गावात महिला आक्रमक होत महिला थेट रस्त्यावर झोपल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Jan 15, 2025 05:45 PM