महिलांचं अनोखं 'बाजा बजाओ आंदोलन', कुठं एकवटले ग्रामस्थ?

महिलांचं अनोखं ‘बाजा बजाओ आंदोलन’, कुठं एकवटले ग्रामस्थ?

| Updated on: Apr 21, 2023 | 11:45 AM

VIDEO | सहा दारूविक्रेत्यांच्या घरापुढे महिलांनी केलं 'बाजा बजाओ आंदोलन', ग्रामस्थ एकवटण्याचे काय आहे कारण?

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात मीचगाव खुर्द येथील अवैध दारूविक्री विरोधात ग्रामस्थ एकवटल्याचे पाहायला मिळाले. सहा दारूविक्रेत्यांच्या घरापुढे महिलांनी ‘बाजा बजाओ आंदोलन’ केल्यानं एकच या अनोख्या अंदोलनाची चर्चा आहे. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मीचगाव खुर्द येथील अवैध दारूविक्रेत्यांना वारंवार सूचना आणि नोटीस देऊनही अवैध व्यवसाय सुरूच आहे. परिणामी घरातील कर्ता पुरुष तांदूळ, कोंबड्या विकून दारूचे व्यसन पूर्ण करीत असल्याने अखेर त्रस्त झालेल्या मीचगाव बुज आणि मीचगाव खुर्द येथील गाव संघटनेच्या महिलांनी दारूविक्रेत्यांच्या घरापुढे ‘बाजा बजाओ आंदोलन’ करून लक्ष वेधले. सोबतच यापुढे अवैध व्यवसाय करणार नाही अशा आशयाच्या शपथपत्रावर सहा विक्रेत्यांची स्वाक्षरी घेतली.

 

 

 

Published on: Apr 21, 2023 11:45 AM