Ladki Bahin Yojana : दादा आमचा फोटो टाका…, काल तक्रार अन् आज महिलांच आमदाराच्या दारात, प्रकरण काय?
भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर संमतीशिवाय फोटो लावल्याचा आरोप त्या फोटोतील महिलांनी केला होता. मात्र आज सिद्धार्थ शिरोळे यांच्या कार्यालयाबाहेर महिलांनी समर्थन दर्शविल्याचे पाहायला मिळाले
पुण्यातील भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर संमतीशिवाय फोटो लावल्याचा आरोप त्या फोटोतील महिलांनी केला होता. मात्र आज सिद्धार्थ शिरोळे यांच्या कार्यालयाबाहेर महिलांनी समर्थन दर्शवल्याचे पाहायला मिळाले. यावेळी महिलांनी आपल्या हातात फलक घेतले होते. त्यामध्ये दादा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर आमचा फोटो टाकाना… असं लिहिलं असून काही महिलांनी सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर तक्रार केल्यानंतर या महिला मदतीला धावून आल्या आहेत. आमचा फोटो बॅनरवर टाका. या योजनेचा आम्हाला फायदा होतोय त्यासाठी आमचे फोटो टाकावे. दादा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आमचे फोटो टाकावे अशा आशयाचे फलक घेवून या महिलांनी सिद्धार्थ शिरोळेंना समर्थन दिलं आहे. तर सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, माझा हेतू चांगला होता मात्र त्यांनी आक्षेप घेतला. मी दिलगिरी पण व्यक्त केली आहे, असे त्यांनी सांगितले.