मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून महिलांचा ट्रॅक्टर मोर्चा, ‘आरक्षण न दिल्यास…’
VIDEO | मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हिंगोली वसमत येथे महिलांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला, आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुणीही शाळेत जाणार नाही, विद्यार्थ्यांनी घेतला निर्णय
हिंगोली, ११ सप्टेंबर २०२३ | जालना येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून वसमत तालुक्यातील अकोली येथे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुणीही शाळेत जाणार नाही, असं निर्णय येथील विद्यार्थ्यांनी घेतला आहे. गावात पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे मात्र आज एकही विद्यार्थी शाळेत गेला नाही, त्याचबरोबर गावातून बाहेर गावी शिकायला जाणारी विद्यार्थी गावातच आंदोलनाच्या ठिकाणी बसून होते, आरक्षण नाही तर शिक्षण नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. तर वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे मराठा आरक्षणासाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी महिलांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा वसमत तहसील कार्यावर काढण्यात आला आहे. गेल्या चार दिवसापासून कुरुंदा येथील स्मशानभूमीत मराठा आरक्षणाबाबत आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा म्हणून हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.