Ajanta Caves Waterfall : ओसंडून वाहू लागला अजिंठा लेणीचा धबधबा; बघा नयनरम्य दृश्य
गेल्या अनेक दिवसापासून छत्रपती संभाजीनगर शहर, जिल्ह्यामध्ये पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी हा संकटात सापडला होता. काल रात्री बाराच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे जगप्रसिद्ध असलेली अजिंठा लेणीचा धबधबा पुन्हा प्रवाहित
छत्रपती संभाजीनगर सोयगाव येथे रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे जगप्रसिद्ध आणि ऐतिहासिक अजिंठा लेणीचा धबधबा ओसंडून वाहू लागल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर छत्रपती संभाजीनगर येथे पावसाची संततधार सुरू झाली आहे. मुसळधार पावसामुळे शेतकरी देखील सुखावला आहे. गेल्या अनेक दिवसापासून छत्रपती संभाजीनगर शहर, जिल्ह्यामध्ये पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी हा संकटात सापडला होता. काल रात्री बाराच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे जगप्रसिद्ध असलेली अजिंठा लेणीचा धबधबा हा पुन्हा प्रवाहित झाल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. तर हा धबधबा ओसंडून वाहू लागल्याने पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. बघा व्हायरल होणार व्हिडीओ…
Published on: Jul 15, 2024 04:51 PM
Latest Videos