‘औकात काढली असती. पण…’, प्रवीण दरेकर यांनी संजय शिरसाट यांना सुनावले
भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. नवरात्रोत्सानिमित्त आमंत्रण देण्यासाठी वर्षा येथे आलो. भेटीमध्ये काहीही राजकीय विषय झाला नाही असे त्यांनी सांगितले. मात्र, यावेळी त्यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांना टोला लगावलाय.
मुंबई : 7 ऑक्टोबर 2023 | शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जे काही विधान केले त्याचा माजी विरोधी पक्षनेते आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी समाचार घेतलाय. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही. त्यांना महाराष्ट्रात ठेवायचे की दिल्लीत न्यायचे हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. शिरसाट यांनी त्यांच्या राजकीय मर्यादेत राहून वक्तव्य केलं पाहिजे. खरं तर मी त्यांची औकात काढली असती. पण, आम्ही युतीमध्ये आहोत म्हणून शांत आहे. देवेंद्रजी इथेच राहतील आणि राज्यातच असतील. जनतेला त्यांची गरज आहे. सकाळी बोलणारी जो काही लोक आहेत त्यांनी थोडे कमी बोलावे. महायुतीमध्ये वितुष्ट येणार नाही याची काळजी घ्यावी, अशी वक्तव्ये करून वातावरण गढूळ करू नये. कमी बोलून जास्त काम करावे, असा टोलाही दरेकर यांनी लगावला.
Published on: Oct 07, 2023 11:28 PM
Latest Videos