देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद म्हणजे भावना भडकवण्याचा प्रयत्न – यशोमती ठाकूर

| Updated on: Nov 21, 2021 | 5:52 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अर्धवट माहिती घेऊन बोलत आहेत. त्यांचं विधान बेजबाबदारपणाचं लक्षण आहे, असा पलटवार अमरावतीच्या पालकमंत्री आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अर्धवट माहिती घेऊन बोलत आहेत. त्यांचं विधान बेजबाबदारपणाचं लक्षण आहे, असा पलटवार अमरावतीच्या पालकमंत्री आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला.

रझा अकादमी आणि कट्टरपंथीयांचा फायदा कुणाला होत असतो हे संपूर्ण हिंदुस्थानाला माहीत आहे. मला बोलण्याची गरज नाही. ज्या गोष्टी हिंसा निर्माण करतात ज्या संस्था सपोर्ट करतात, जे लोक हिंसक बोलतात त्यांच्यावर कारवाई केली आहे. ज्यांनी उद्या काही हिंसा भडकवली तर त्यांच्यावरही कारवाई करू. कुणालाही सोडणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.