सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई अन्…, यशोमती ठाकूर आक्रमक

सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई अन्…, यशोमती ठाकूर आक्रमक

| Updated on: Jul 27, 2023 | 2:47 PM

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबतीत आक्षेपार्ह लेखन प्रकरणावरून आज सभागृहात गदारोळ माजला. सावित्रीबाई फुले आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसले.

मुंबई, 27 जुलै 2023 | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबतीत आक्षेपार्ह लेखन प्रकरणावरून आज सभागृहात गदारोळ माजला. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणारा गुन्हेगार मोकाट आहे. सरकार या सगळ्या संदर्भात शांत कसे बसू शकते, असा सवाल काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला. सावित्रीबाई फुले आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर चांगलेच आक्रमक झाले आहेत. सभागृहात बाळासाहेब थोरात आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. तर यानंतर यशोमती ठाकूर यांनी माध्यमांसमोर येताच सभागृहात काय घडलं याची माहिती दिली. यावेळी यशोमती ठाकूर यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. यशोमती ठाकूर नेमकं काय म्हणाल्या यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Jul 27, 2023 02:47 PM