Yashomati Thakur | अमरावतीत मोर्चाला कुणीही परवानगी दिली नव्हती, यशोमती ठाकूर यांचं प्रत्युत्तर

Yashomati Thakur | अमरावतीत मोर्चाला कुणीही परवानगी दिली नव्हती, यशोमती ठाकूर यांचं प्रत्युत्तर

| Updated on: Nov 21, 2021 | 4:46 PM

अमरावतीच्या पालकमंत्री आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील कोणत्याही मोर्चाला परवानगी दिली नव्हती. मोर्चाची परवानगी नाकारली होती, असं म्हटलं आहे.

अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी झालेली घटना निंदनीय आहे. पण 13 तारखेला घडलेली घटना त्याहूनही निंदनीय आहे. या दोन्ही घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस तपास करत आहेत, असं सांगतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अर्धवट माहिती घेऊन बोलत आहेत. त्यांचं विधान बेजबाबदारपणाचं लक्षण आहे, असा पलटवार अमरावतीच्या पालकमंत्री आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला.  कोणत्याही मोर्चाला परवानगी दिली नव्हती. मोर्चाची परवानगी नाकारली होती. या ठिकाणी इंटेलिजन्स फेल झालं. का झालं यांचं आश्चर्य आहे. इंटेलिजन्स फेल जाण्यास कोणी अधिकारी जबाबदार असेल तर कारवाई करू. इंटेलिजन्स फेल गेलं त्याची चौकशी झालीच पाहिजे. मी कारवाईचा आग्रह धरला आहे. पत्रं तयार आहे. कॅबिनेटमध्ये पत्रं देऊन चर्चा करणार, असं त्यांनी सांगितलं.