Rahul Gandhi | महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं शक्तिप्रदर्शन!! गांधी-ठाकरे-पवार एकत्र दिसणार का?
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला आज वाशिम शहरातून सुरू झाली. महाराष्ट्रातील या यात्रेचा 10 वा दिवस आहे.
बुलढाणाः अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष सध्या शेगावच्या काँग्रेसच्या (Congress) सभेकडे लागलंय. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा 18 नोव्हेंबर रोजी शेगावमध्ये असेल. या दिवशी काँग्रेसतर्फे मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांनाही येथे आमंत्रित करण्यात आलंय. त्यामुळे गांधी-ठाकरे-पवार घराण्यातील दिग्गज नेते 18 तारखेच्या सभेत एकत्रित दिसतात, हे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी याविषयी माहिती दिली.
शेगाव येथील सभेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे येणार का.. याबाबतीत शिक्कामोर्तब झाला नसल्याचे माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केलंय. 19 नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन असल्याने त्यांच्या समाधीवर सोनिया गांधी उपस्थित राहणार आहेत… त्याचबरोबर बुलढाणा मध्ये रात्रीच्या विमान उड्डाणासाठी व्यवस्था नसल्याने, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे शेगावच्या सभेला उपस्थित राहण्यासंदर्भात निश्चित झाले नसल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला आज वाशिम शहरातून सुरू झाली. महाराष्ट्रातील या यात्रेचा 10 वा दिवस आहे. सकाळी 6 वाजता सुरू झालेल्या यात्रेत मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते. तरुणाईचा सहभाग या यात्रेत वाढताना दिसतोय. तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्थेत सुरक्षेच्या डी झोन मध्ये राहूल गांधी भारत जोडो यात्रेत चालतात.
येत्या 18 तारखेला काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा बुलढाणा जिल्ह्यात येत आहे. ही पदयात्रा जिल्ह्यात तीन दिवस असेल. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.. या पदयात्रेसोबत पायी चालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सवय व्हावी, म्हणून बुलढाणा पोलीस दलाकडून पोलीस कर्मचाऱ्यांचं “वार्मिंग अप ” घेण्यात आलं. यात महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेक अधिकारीही सामील झाले.
भारत जोडो यात्रेच्या शेगाव येथील सभा मैदानाची पाहणी करीत येथील संपूर्ण नियोजन करून आवश्यक त्या सूचना केल्या. #BharatJodoYatra #Congress #RahulGandhi pic.twitter.com/qehBwuY45s
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) November 7, 2022
18 तारखेला शेगाव बाळापूर मार्गावरील जवळा-वरखेड गावाजवळील मार्गावर विष्णुपंत हरिभाऊ कानडे या ज्येष्ठ काँग्रेस नेत्याच्या शेतात एक मोठा कार्यक्रम होणार आहे. शेतात यासाठी 20 फूट उंचीची विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात आली आहे. त्याभोवती एक हजार वारकरी रिंगण सोहळा सादर करतील. वारकऱ्यांकडून राहुल गांधी यांचं स्वागत केलं जाईल. या सोहळ्यात राहुल गांधी हे वारकऱ्याचा वेष परिधान करतील, अशी माहिती मिळाली आहे. शेगावमधील सभेला लाखो काँग्रेस कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक जमतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.