Yavatmal | राज्य सरकारचे नियम झुगारुन मनसेकडून बैलपोळा सण साजरा
मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या आव्हाणाला ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद देत आज पोळा साजरा करत प्रशासन विरोधात आंदोलन करण्यात आले. श्रावणात पिठोरी अमावस्येला महाराष्ट्रात सर्जा-राजाचा सण हा बैलपोळा म्हणून साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कष्टाचे आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या आव्हाणाला ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद देत आज पोळा साजरा करत प्रशासन विरोधात आंदोलन करण्यात आले. श्रावणात पिठोरी अमावस्येला महाराष्ट्रात सर्जा-राजाचा सण हा बैलपोळा म्हणून साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कष्टाचे आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरुन राजू उंबरकर यांनी आक्रमक पवित्रा अवलंबत शासनाच्या आदेशाविरुद्ध एल्गार पुकारुन ग्रामीण भागात स्वतः उपस्थिती दर्शवत पोळा साजरा केला.
पोळा सणाला ग्रामीण भागात विशेष महत्त्व असते. यानिमित्ताने ठिक ठिकाणी यात्रा मेळाव्याचे देखील आयोजन होते परंतू प्रशासनाने मोठा पोळा व तान्हा पोळा सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास प्रतिबंध घातले आहे. हा सण घरीच साजरा करावा बैलांच्या मिरवणूका काढण्यात येऊ नये. आरती, पुजा व अन्य धार्मिक कार्यक्रमात गर्दी करु नये असे आव्हान केले असता शासनच्या आव्हानाचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ग्रामीण भागात बैलपोळा साजरा करण्यात आला.
Latest Videos