शेतकरी पुत्राची ट्रॅक्टर वरून काढली लग्नाची वरात ; वडस्कर कुटुंबाच्या अनोख्या वरातीची चर्चा
मुलगा शेतीकाम करतो म्हणून नवरदेवाची गाडी म्हणून चक्क वडस्कर यांनी शेतीची मशागत करणारा आपल्या घरचा ट्रॅक्टर आणला व त्यावरूनच वरात काढली.ट्रॅक्टर ला सजवून त्यावरून नवरी मुलीला सुद्धा घरी आणण्यात आले.
यवतमाळ जिल्ह्यातील झरीजामनी मध्ये झालेल्या विवाहाची चर्चा सुरु आहे. शुभम वडस्कर या शेतकरी पुत्राने आपली वरात ट्रॅक्टरवरुन काढली. मुलगा शेतीकाम करतो म्हणून नवरदेवाची गाडी म्हणून चक्क वडस्कर यांनी शेतीची मशागत करणारा आपल्या घरचा ट्रॅक्टर आणला व त्यावरूनच वरात काढली.ट्रॅक्टर ला सजवून त्यावरून नवरी मुलीला सुद्धा घरी आणण्यात आले. शुभम वडस्कर याचा विवाह रविना रेकलवार हिच्याशी मोठ्या थाटात पार पडला. या विवाहाची चर्चा पंचक्रोशीत होत आहे.
Latest Videos