नवजात शिशू कक्षात वेल्डिंगचे काम सुरू असताना बाळाच्या बेडवर पडली ठिणगी अन्...

नवजात शिशू कक्षात वेल्डिंगचे काम सुरू असताना बाळाच्या बेडवर पडली ठिणगी अन्…

| Updated on: May 23, 2023 | 1:27 PM

VIDEO | नवजात शिशू कक्षातील बेडला लागली आग अन्..., नेमकी कुठं काय घडली घटना?

यवतमाळ : यवतमाळ वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयातील नवजात शिशु कक्ष वार्डमध्ये आज मोठी दुर्घटना टळल्याचे समोर आले आहे. यवतमाळ वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयातील नवजात शिशु कक्ष वार्डमध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास वेल्डिंगचे काम चालू असताना वार्डमध्ये असलेल्या बेड वरील गादीवर वेल्डिंग करताना ठिणगी पडल्याने गादीने अचानक पेट घेतला. पेट घेताच तेथील मशुब सुरक्षारक्षकाने लगेचच तिथे असलेल्या अग्निशमक बंबाद्वारे ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तेथील बालकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना लगेचच वॉर्डाच्या बाहेर काढण्यात आले मात्र या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती वरिष्ठ डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या धक्कादायक घटनेनंतर यवतमाळ वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयातील नवजात शिशु कक्ष वार्डमध्ये असणारे सगळे बालकं सुरक्षित असल्याची माहिती मिळतेय.

Published on: May 23, 2023 01:27 PM