स्पेनच्या बर्सीलोना शहरात विराजमान झाला गणपती बाप्पा, यवतमाळच्या तरुणाचा पुढाकार

स्पेनच्या बर्सीलोना शहरात विराजमान झाला गणपती बाप्पा, यवतमाळच्या तरुणाचा पुढाकार

| Updated on: Sep 21, 2023 | 9:25 PM

यवतमाळच्या तरुणाने पुढाकार घेतला. त्याने शहरातील २०० मराठी नागरिकांना एकत्र केले. महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली. त्या मध्यामातुन यंदा स्पेन देशातील बर्सीलोना पहिल्यांदाच गणेशोत्सव साजरा केलाय.

बर्सीलोना : मुंबईसह राज्यात गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. देशभरातील नागरिक मुंबई, पुणे येथील श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भक्तीभावाने येथे येत आहेत. मात्र, बाप्पाचा हा उत्सव केवळ मुंबई आणि महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही तर तो सातासमुद्रापार पोहोचला आहे. स्पेनमधील बर्सीलोना शहरात मोठ्या उत्साहात गणपतीची स्थापना करण्यात आलीय. स्पेनमधील महाराष्ट्र मंडळाने यावर्षी पहिल्यांदाच बर्सीलोना शहरात सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना केलीय.

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसच्या ऋषिकेश लाचुरे यांनी बर्सीलोना शहरात महाराष्ट्र मंडळ आणि गणेशोत्सवाची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. चांद्रयान तीन मोहिमेच्या पार्श्वभूमीवर इस्रोच्या शास्त्रज्ञांना समर्पित करणार देखावा या मंडळाने साकारला आहे. बर्सीलोना शहरातील जवळपास २०० मराठी आणि भारतीयांनी या उत्सवात सहभाग घेतलाय. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल या गणेशोत्सवात होतेय. तेथील भारतीय राजदूतांनीही या गणपती उत्सवाला भेट दिलीय.

Published on: Sep 21, 2023 09:25 PM