दुष्काळी झळा असलेल्या विदर्भात पावसाचा अंदाज; कधी होणार पाऊस अन् कोणता दिला अलर्ट?
VIDEO | विदर्भात हवामान विभागाने वर्तवला पावसाचा अंदाज, नागपूरसह विदर्भाच्या काही भागात पुढील दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट...नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहन शाहू बघा काय म्हणाले?
नागपूर, ६ सप्टेंबर २०२३ | दुष्काळाच्या झळा सहन करत असलेल्या विदर्भात हवामान विभागावे पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नागपूरसह विदर्भाच्या काही भागात पुढील दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस मुसळाधार पावसाचा अंदाज आहे. त्याशिवाय पुढील काही दिवस हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. विदर्भातील बऱ्याच भागात पावसाचा मोठा खंड पडला, शेतकरी दुष्काळाच्या झळा सहन करत होते. ॲागस्ट महिन्यात गेल्या २० वर्षांतला सर्वात कमी पाऊस पडला. त्यामुळे शेतकरी संकटात होते. पण गेल्या २४ तासांत नागपूर जिल्हयात १७ मीमी पावसाची नोंद झालीय. त्याशिवाय विदर्भातील सर्वच जिल्हयात पाऊस पडलाय. त्यामुळे खरीपातील कापूस, सोयाबीन, भाजीपाला पिकालाही या पावसाचा फायदा झालाय. पावसाच्या अंदाजाबाबत नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहन शाहू बघा काय म्हणाले?
Published on: Sep 06, 2023 01:55 PM
Latest Videos