दुसऱ्यांदा Yogi Adityanath यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली

| Updated on: Mar 25, 2022 | 8:41 PM

योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये 48 मंत्र्यांनी शपथ घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शपथ घेण्यापूर्ण अनेक आमदार योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्यासाठी पोहचल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशातील योगींच्या भव्य शपथविधीची चर्चा अवघ्या देशात सुरू आहे.

लखनऊ : आज योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची (CM yogi aadityanath) दुसऱ्यांदा शपथ घेतली. विशेष म्हणजे योगी सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री झाले आहेत. या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. आज सायंकाळी 4 वाजता लखनऊ येथील अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर शपथविधी सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये 48 मंत्र्यांनी शपथ घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शपथ घेण्यापूर्ण अनेक आमदार योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्यासाठी पोहचल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशातील योगींच्या भव्य शपथविधीची चर्चा अवघ्या देशात सुरू आहे.