‘दारू पाजून, मटण खाऊन मत तर मिळतं, पण…’ आमदार बच्चू कडू याचं नेमकं विधान काय?
जगातले आणि देशातले पहिले दिव्यांग मंत्रालय आपल्या राज्यात आहे. हे मंत्रालय आधार झालं पाहिजे. तुमच्या आशीर्वादाने आम्ही हे काम करू. पन्नास वर्षांचे काम चार ते पाच महिन्यात होऊ शकत नाही. पण, हे मंत्रालय तुमचं पूर्ण ऐकून घेईल असे बच्चू कडू म्हणाले.
नाशिक : 05 सप्टेंबर 2023 | दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र घरकुल योजना हवी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय दिले. याला ते निधी कमी पडू देणार नाही. त्यांच्यावरील विश्वासामुळे आपण आंदोलन केलं नाही. दिव्यापासून एका नवीन सूर्योदय होईल. भाषण करतो आणि जातो, असं बच्चू कडू कधी करत नाही. नाशिकमध्ये दिव्यांग कल्याण विभागातर्फे नाशिक शहरातील ठक्कर डोम येथे ‘दिव्यांगांच्या दारी’ उपक्रम पार पडला. त्यावेळी बच्चू कडू बोलत होते. अधिकाऱ्यांनी दोन पावले दमदार टाकले तर दिव्यांग बांधव चार पावले टाकतील. आम्हाला हात, डोळे आहे. पण काही गोष्टी कमी आहेत. तुमच्याकडे पहिले की आमचे दुःख निघून जाते, असे ते म्हणाले. आमदार, खासदार कायदा तोडतात त्याचप्रमाणे दिव्यांग बांधवांच्या घरासाठी कायदा तुटला तरी हरकत नाही. अगर भगतसिंह जान दे सकता हैं, तो हम इतना तो कर सकते हैं। दारू पाजून, मटण खाऊन मत मिळतात पण त्यापेक्षा आशीर्वाद महत्त्वाचे आहे, असे बच्चू कडू म्हणाले.