Pension Scheme | जुनी पेन्शन योजना आणि नव्या पेन्शन योजनेत नेमका काय फरक आहे, माहितीये का?
VIDEO | जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी तब्बल १८ लाख कर्मचारी बेमुदत संपावर, पण कोणता फरक आहे जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेमध्ये...जाणून घ्या
मुंबई : राज्यातील जवळपास १८ लाख सरकारी कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करावी. या प्रमुख मागणीसाठी हे सर्व सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरणार आहेत. मात्र जुनी पेन्शन योजना आणि नव्या पेन्शन योजनेत नेमका काय फरक आहे, तुम्हाला माहिती आहे का? जुन्या पेन्शनमध्ये पगार ३० हजार, पेन्शन १५ हजार होते तर पगारातून कोणतीही कपात होत नव्हती तर नव्या पेन्शमध्ये ३० हजार पगार तर पेन्शन २७०० रूपये होते आणि दरमहा पगारातून कपात होते. जुन्या पेन्शन योजनेत ग्रॅज्युटी, जीपीएफ, महागाई भत्ता आणि मृत्यूनंतर वारशाला पेन्शन दिले जायचे तर नव्या पेन्शन योजनेत या कोणत्याही सवलती दिल्या जात नसून त्या बंद करण्यात आल्या आहेत. बघा आणखी कोणता फरक आहे नव्या आणि जुन्या पेन्शन योजनेत…
Published on: Mar 13, 2023 05:44 PM
Latest Videos