Old Vs New Pension : जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?

Old Vs New Pension : जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?

| Updated on: Sep 16, 2024 | 11:33 AM

हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यात आली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जुनी पेन्शन लागू करण्याचं वचन दिलं आहे. तुम्हाला माहितीये का? जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक काय?

OPS म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम ओल्ड पेन्शन स्कीममध्ये कर्मचाऱ्यांना एक ठराविक रक्कम पेन्शन म्हणून मिळत होती. त्यात कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळण्याची तरतूद होती. निश्चित पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांना त्यात काही योगदान देणं बंधनकारक नव्हतं. कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील सदस्याला ती पेन्शन सुरु राहात होती. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच पेन्शनरांना महागाई भत्ता आणि डीएमधील वाढ मिळत होती. जुन्या योजनेत रिटायरमेंटनंतर त्या कर्मचाऱ्याच्या मेडिकल बिलांच्या रिएंबर्समेंटची सोय होती. त्याशिवाय कर्मचाऱ्यांना 20 लाख रुपयांपर्यंत ग्रॅच्युईटी रक्कमही दिली जात होती. तर एनपीएस म्हणजे न्यू पेन्शन स्कीम सरकारने जुनी पेन्शन योजना रद्द करुन 2004 मध्ये नवी पेन्शन योजना (एनपीएस) आणली. ही योजना सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आहे. एनपीएसमध्ये कर्मचारी निवृत्त झाल्यावर आपल्या बचतीचा एक भाग काढू शकतो. त्यानंतर उर्वरित रक्कमेवर त्याला निवृत्तीवेतन घेता येते. त्याला शेवटच्या पगाराची 35 टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळू शकते. एनपीएसमधील पैसा सरकार शेअर बाजार, सरकारी बॉन्ड्स आणि विविध कंपन्यांच्या बॉन्ड्समध्ये लावतो.

Published on: Sep 16, 2024 11:33 AM