भाजप आमदाराच्या नावानं चिठ्ठी अन् तरूणाची आत्महत्या, चिठ्ठीत जे काही म्हटलं त्यानं उडाली खळबळ

भाजप आमदाराच्या नावानं चिठ्ठी अन् तरूणाची आत्महत्या, चिठ्ठीत जे काही म्हटलं त्यानं उडाली खळबळ

| Updated on: Aug 08, 2024 | 5:41 PM

बदनापूर भाजपाचे आमदार नारायण कुचे आणि त्यांच्या भावाच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. जयदत्त सूर भैय्या असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नावं आहे. नातेवाईकांनी मृत तरुणाकडं एक चिठ्ठी आढळून आल्याचा दावा देखील केला आहे.

आमदाराच्या नावाने एक चिठ्ठी लिहून एका तरूणाने आत्महत्या करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा या भागात ही घटना घडली असून चिठ्ठीत भाजप आमदार नारायण कुचे आणि त्यांचे बंधू देविदास कुचे यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. जगदीश सूर भैय्या असं आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार कुचे यांच्या पतसंस्थेतून तरुणानं कर्ज घेतलं होतं. कर्ज असल्यानं धमक्यांचा त्रास होत असल्यानं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये भाजपाचे आमदार नारायण कुचे आणि त्यांच्या भावाचं नाव आहे, असा दावा नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी या तरुणाच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आमदार नारायण कुचे आणि त्यांच्या भावावर गुन्हा दाखल करून तातडीनं अटक करण्याची मागणी पोलिसात केली आहे.

Published on: Aug 08, 2024 05:41 PM