VIDEO : स्टंटबाजी आली अंगलट... पुराच्या पाण्यात त्यानं चालवली बाईक, पाण्याचा वेग अचानक वाढला अन्...

VIDEO : स्टंटबाजी आली अंगलट… पुराच्या पाण्यात त्यानं चालवली बाईक, पाण्याचा वेग अचानक वाढला अन्…

| Updated on: Jul 28, 2024 | 4:28 PM

नांदेडमध्ये देखील तुफान पावणारे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच नांदेडमधील हदगाव येथील पुराच्या पाण्यात एका तरूणाची स्टंटबाजी पाहायला मिळाली. पुराच्या पाण्याची एक तरूण दुचाकीवर बसून स्टंट करत होता. दुचाकी घेऊन पुराच्या पाण्यात दुचाकी चालवण्याचा प्रकार यावेळी पाहिला मिळाला.

राज्यभरात सध्या मुसळधार पावसाने एकच थैमान घातले आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यात नागरिकांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. नांदेडमध्ये देखील तुफान पावणारे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच नांदेडमधील हदगाव येथील पुराच्या पाण्यात एका तरूणाची स्टंटबाजी पाहायला मिळाली. पुराच्या पाण्याची एक तरूण दुचाकीवर बसून स्टंट करत होता. दुचाकी घेऊन पुराच्या पाण्यात दुचाकी चालवण्याचा प्रकार यावेळी पाहिला मिळाला. स्टंटबाजी करताना तरूणाची चांगलीच तारांबळ उडाली. पुराच्या पाण्याचा वेग अचानक वाढल्याने स्टंटबाजी करणाऱ्या तरूणाची दुचाकी वाहून गेली. मात्र सुदैवाने तरूणाचे प्राण थोडक्यात बचावले. पुराच्या पाण्यात हा तरूण आपली दुचाकी चालवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र या तरूणाची स्टंटबाजी त्याच्याच अंगलट आल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Jul 28, 2024 04:28 PM