VIDEO : पुराच्या पाण्यात स्टटंबाजी महागात, सोलापुरात तरुण तीन किलोमीटर वाहून गेला
पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. चांदणी नदीच्या पुलावर काही अतिउत्साही तरुण स्टंटबाजी करत असताना त्यातला एक तरुण पाण्याच्या लोंढ्यामध्ये वाहून गेला.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये मागच्या चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. यामुळे मांडेगावच्या चांदणी नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. चांदणी नदीच्या पुलावर काही अतिउत्साही तरुण स्टंटबाजी करत असताना त्यातला एक तरुण पाण्याच्या लोंढ्यामध्ये वाहून गेला. नशीब बलवत्तर म्हणून तीन किलोमीटरच्या अंतरावर त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामुळे गावकऱ्यांचा जीव भांड्यात पाडला आहे. पांडुरंग कदम असं या अतिउत्साही स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.