Yugendra pawar : पवारांवर टीका करणाऱ्यांवर बोलताना युगेंद्र पवारांनी आपल्या काकालाच फटकारलं, ‘अजित पवारांनी तरी…’
१०० शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला आला आहे, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला होता. यासंदर्भात युगेंद्र पवार यांना सवाल केला असता त्यांनी प्रत्युत्तर देताना आपले काका आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चांगलंच सुनावलं
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील मारकडवाडीत ईव्हीएम समर्थनार्थ काल भाजप अन् महायुतीची जाहीर सभा घेतली. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. १०० शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला आला आहे, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला होता. यासंदर्भात युगेंद्र पवार यांना सवाल केला असता त्यांनी प्रत्युत्तर देताना आपले काका आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चांगलंच सुनावल्याचे पाहायला मिळाले. गोपीचंद पडळकर काय बोलले मी ऐकलं नाही, असं म्हणत शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेवर भाष्य केले आहे. युगेंद्र पवार पुढे नाव न घेता असेही म्हणाले, त्यांच्याकडून आम्ही वेगळं काही अपेक्षित करत नाही. वाईट याचं वाटतं कारण ते महायुतीत आहेत. महायुतीत राष्ट्रवादी पक्ष देखील आहे. त्यांनी यावर आक्षेप घेतला पाहिजे. कारण शरद पवार हे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि मोठे नेते आहेत. राज्यातील आणि देशातील लोक त्यांचा आदर करतात. ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे युगेंद्र पवार म्हणाले. तर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रश्न विचारण्यात आला असता युगेंद्र पवार म्हणाले, तीन पक्षांनी मिळून एकत्रित सरकार स्थापन केलं आहे. त्यांच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे त्यांना वेळ लागत असावा, असा टोलाही त्यांनी लगावला.