शरद पवार म्हणतील तसं... नातवाचा आजोबांना फुल्ल सपोर्ट, युगेंद्र पवार यांचे सूचक वक्तव्य काय?

शरद पवार म्हणतील तसं… नातवाचा आजोबांना फुल्ल सपोर्ट, युगेंद्र पवार यांचे सूचक वक्तव्य काय?

| Updated on: Feb 21, 2024 | 5:25 PM

अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे शरद पवार गटात सामील होणार असल्याची चर्चा होतेय. मात्र युगेंद्र पवार यांनी स्वतःच यावर भाष्य केले आहे. खरंतर मी राजकारणात नाही पण....

पुणे, २१ फेब्रुवारी २०२४ : अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे शरद पवार गटात सामील होणार असल्याची चर्चा होतेय. मात्र युगेंद्र पवार यांनी स्वतःच यावर भाष्य केले आहे. ‘खरंतर मी राजकारणात नाही पण पक्षाचं नवं कार्यालय तयार झालं आणि त्यासाठी मला बोलवलं गेलं.. आणि मी आलो होतोच म्हणून मी कार्यालयाला भेट दिली. ही भेट द्यायची हे आधीपासूनच ठरलं होतं. पण त्यांची एवढी चर्चा होईल असं वाटलं नव्हतं.’, असे ते म्हणाले तर अजित पवार म्हणाले होते की, कुटुंबात त्यांना एकट पाडलं जाईल. या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, मला असं वाटत नाही. कुटुंब फुटलंय, अजितदादांना एकट पाडलं जातय असं नाही, कुटुंब एकच आहे. कुटुंब वेगळं ठेवलं पाहिजे. कुटुंबात मी छोटा माणूस आहे. मी आज फक्त कार्यालय बघायला आलोय” असे म्हणत असताना राजकारणात येण्याची इच्छा देखील युगेंद्र पवार यांनी बोलून दाखवली.

Published on: Feb 21, 2024 05:25 PM