Breaking | नितेश राणे यांच्याविरोधात युवासेनेचं आंदोलन

Breaking | नितेश राणे यांच्याविरोधात युवासेनेचं आंदोलन

| Updated on: Jul 07, 2021 | 12:29 PM

नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर मुंबईतील शिवसैनिक जोरदार आक्रमक झाले. आज सकाळी भारतमाता सिनेमासमोर नितेश राणे यांचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी आंदोलन केलं.

नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर मुंबईतील शिवसैनिक जोरदार आक्रमक झाले. आज सकाळी भारतमाता सिनेमासमोर नितेश राणे यांचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी आंदोलन केलं. यावेळी नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा पुतळा देखील जाळण्यात आला. यादरम्यान पोलीस आणि शिवसेना कार्यकर्ते यांच्यामध्ये झटापट देखील पाहायला मिळाली. आमदार अजय चौधरी यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका करत त्यांनी माफी मागावी आणि इथून पुढे बोलताना तोंड सांभाळून बोलावं, असं प्रत्युत्तर नितेश राणेंना दिलं.