मातोश्रीबाहेर ‘काल, आज आणि उद्या दैवत’, अशा आशयाची कुणी केली बॅनरबाजी?
VIDEO | केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मातोश्रीबाहेर युवासेना कार्यकर्त्यांची बॅनरबाजी
मुंबई : निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर आज सकाळपासून उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह देण्यात आल्यानंतर ठाकरे गटात खळबळ उडाली असताना काही शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंवर विश्वास दाखवत त्यांची भेट घेतली. मुंबईतील उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थाना बाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केल्याचे पाहायला मिळाले. ‘काल,आज आणि उद्या दैवत’, अशा आशयाची बॅनरबाजी युवासेना कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी त्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाच्या गेटवर येऊन या कार्यकर्त्यांची भेट घेतली. तर पुण्याहून उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी काही कार्यकर्ते आले होते. त्यावेळी या कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर बॅनरबाजी केली.