तर काँग्रेस संपेल, माझ्याविरोधात षडयंत्र...; वरूण सरदेसाईंच्या भेटीनंतर झिशान सिद्दीकी नेमकं काय म्हणाले?

तर काँग्रेस संपेल, माझ्याविरोधात षडयंत्र…; वरूण सरदेसाईंच्या भेटीनंतर झिशान सिद्दीकी नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Aug 04, 2024 | 5:59 PM

'वांद्रे पूर्व विधानसभेत काँग्रेसचा एक विद्यमान आमदार असला, तरी ही जागा शिवसेनेच्या वाट्याला जाते किंवा चर्चा सुरू झाली, तर काँग्रेसचे प्रवक्ते आणि वरिष्ठ नेत्यांनी बाहेर येऊन ही जागा आमची आहे आणि आम्हीच लढेल, असे सांगावे. ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली तर काँग्रेस कार्यकर्त्याचा पराभव ठरेल'

काँग्रेसने एसी हॉटेलमध्ये सभा घेत राहूदे, आपण उन्हात लोकांसोबत उभे राहू, ते बोलत राहूदे, आम्ही चर्चा करत राहू आणि आपण लोकांची मने जिंकत राहू, असे वक्तव्य करत झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेसला खोचक टोला लगावला आहे. तर वरुण सरदेसाई काँग्रेसच्या बैठकीत एकटे गेले तर कदाचित त्यांना काँग्रेसमध्ये जावे लागेल. मात्र काँग्रेस पक्षाने मला या बैठकीला बोलावले नाही. आणि आजकाल मला काँग्रेसच्या कोणत्याही बैठकीला बोलावले जात नाही. पण आम्ही लोकांमध्ये जाऊन त्यांची सेवा करतो. वांद्रे पूर्व विधानसभेत काँग्रेसचा एक विद्यमान आमदार असला, तरी ही जागा शिवसेनेच्या वाट्याला जाते किंवा चर्चा सुरू झाली, तर काँग्रेसचे प्रवक्ते आणि वरिष्ठ नेत्यांनी बाहेर येऊन ही जागा आमची आहे आणि आम्हीच लढेल, असे सांगावे. ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली तर काँग्रेस कार्यकर्त्याचा पराभव ठरेल. शिवसेना उबाठा म्हणेल आम्हीही तेच करणार, तर कसे चालेल? असा सवाल झिशान सिद्दीकी यांनी यावेळी केला. तर माझ्याविरुद्ध अनेक वर्षांपासून षडयंत्र रचले जात आहे, काही नेतेही मला बाजूला करण्यात धन्यता मानत आहेत. शिवसेनेने उबाठा उमेदवाराचा पराभव करून ही जागा जिंकली असल्याचेही झिशान सिद्दीकी यांनी यावेळी म्हटले.

Published on: Aug 04, 2024 05:59 PM