Vijay Wadettiwar LIVE | झेडपी, पंचायत समिती निवडणुका होऊ नये ही आमचीही भूमिका होती : विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar LIVE | झेडपी, पंचायत समिती निवडणुका होऊ नये ही आमचीही भूमिका होती : विजय वडेट्टीवार

| Updated on: Jul 09, 2021 | 8:06 PM

राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित election of zp and panchayat samiti of five districts postpone

कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरली नसतांनाच तिसऱ्या लाटेची आणि डेल्टा प्लसचा मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची भिती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू असल्याने राज्यातील 5 जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. मदान यांनी सांगितले की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदांमधील 70 निवडणूक विभाग आणि 33 पंचायत समित्यांमधील 130 निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार होते; परंतु 7 जुलै 2021 रोजी राज्य शासनाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती.

Published on: Jul 09, 2021 08:06 PM