अभिजीत बिचुकले यांचं डिपॉझिट जप्त, 500 मतं मिळतानाही नाकी नऊ

वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरेश माने आणि अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) यांच्यात लढत झाली.

अभिजीत बिचुकले यांचं डिपॉझिट जप्त, 500 मतं मिळतानाही नाकी नऊ
Follow us
| Updated on: Oct 24, 2019 | 12:43 PM

Abhijit Bichukale lose deposit मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल स्पष्ट होत आहेत. एक्झिट पोलचे आकडे आल्यानंतर राज्यात पुन्हा भाजप-शिवसेना युतीचं सरकार येण्याचा अंदाज (Abhijit Bichukale lose deposit) वर्तवण्यात आला. निकालातही तेच चित्र दिसत आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या वरळी विधानसभा (worli vidhan sabha) निवडणुकीत काय होणार याची उत्कंठा सर्वत्र होती. वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरेश माने आणि अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) यांच्यात लढत झाली.

ठाकरे घराण्यातील पहिलाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने, राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष वरळी विधानसभेकडे लागले. आदित्य ठाकरे यांना विजयी करण्यासाठी संपूर्ण शिवसेना कामाला लागली. वरळीचे आमदार सुनील शिंदे, राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले सचिन अहिर, शाखाप्रमुख आशिष चेंबूरकर यांनी आदित्य ठाकरेंच्या प्रचाराची धुरा सांभाळली.

आदित्य ठाकरेंचा झंझावात रोखण्यासाठी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले मैदानात उतरले. मूळचे साताऱ्याचे असलेले अभिजीत बिचुकले यांनी वरळीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र शिवसेनेच्या झंझावातापुढे त्यांचा टिकाव लागला नाही. त्यांनी मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी आपला पराभव मान्य केला.

अभिजीत बिचुकलेचं डिपॉझिट जप्त

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वरळीतून लढणाऱ्या अभिजीत बिचुकले यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. बिचुकलेंना पहिल्या 8 फेऱ्यांमध्ये केवळ 394  इतकी मतं मिळाली. डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवाराला एकूण मतदानाच्या 16.6 टक्के मतं मिळणं आवश्यक असतं. मात्र बिचुकलेंना तितकी मतं मिळाली नाहीत. वरळीत 21 ऑक्टोबरला झालेल्या मतदानात 50 टक्के मतदानाची नोंद झाली होती. 8 फेऱ्यांअखेर आदित्य ठाकरे हे 33 हजार मतांनी आघाडीवर होते.

किती आहे अनामत (डिपॉझिट) रक्कम

लोकप्रतिनिधी कायद्यानुसार विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला अर्ज दाखल करताना 10 हजार रुपये अनामत (डिपॉझिट) रक्कम जमा करावी लागते. अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातीमधील (एसटी) उमेदवाराला यातून काही सूट देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी ही रक्कम 5 हजार रुपये आहे.

लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला अर्ज दाखल करताना 25 हजार रुपयांची अनमात (डिपॉझिट) रक्कम जमा करावी लागते. अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातीमधील (एसटी) उमेदवाराला यातून काही सूट देण्यात आली आहे. एससी आणि एसटी उमेदवारांना 12 हजार 500 रुपये अनामत रक्कम जमा करावी लागते.

कशी जप्त केली जाते अनामत रक्कम

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीला उभा राहिलेला उमेदवार त्या जागेवर झालेल्या एकूण मतदानापैकी 1/6 (16.6%) टक्के मते घेण्यासही अपयशी ठरला, तर त्याने अर्ज करताना जमा केलेली अनामत रक्कम जप्त केली जाते. उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होण्याच्या या घटना अगदी पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून होत आहेत. 1951-52 च्या सर्वसाधारण निवडणुकीत 1 हजार 874 उमेदवारांपैकी 745 उमेदवारांची अनमात रक्कम जप्त झाली होती. 1996 च्या लोकसभा निवडणुकीत 91 टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. पहिल्या सर्वसाधारण निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांच्या एकूण 28 टक्के उमेदवारांना आपली अनामत गमावण्याची नामुष्की आली होती.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.