आमच्या येथे डिपॉझिट जप्त करुन मिळेल, बारामतीत ‘पुणेरी’ पाट्या!

बारामतीत शरद पवार यांच्या 'गोविंदबाग' या निवासस्थानाजवळच 'आमच्या येथे डिपॉझिट जप्त करुन मिळेल' असा मजकूर असलेला अजित पवार यांचं अभिनंदन करणारा फलक लावण्यात आला आहे.

आमच्या येथे डिपॉझिट जप्त करुन मिळेल, बारामतीत 'पुणेरी' पाट्या!
Follow us
| Updated on: Oct 29, 2019 | 7:57 AM

बारामती : ‘आमच्या येथे डिपॉझिट जप्त करुन मिळेल’ असा मजकूर लिहिलेला, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांचं अभिनंदन करणारा फलक (Ajit Pawar Banner in Baramati) बारामतीत लक्ष वेधून घेत आहे. अजित पवारांनी विक्रमी मताधिक्य मिळवत सर्वच विरोधी उमेदवारांचं डिपॉझिट केलं होतं.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार तब्बल एक लाख 65 हजार 265 मतांनी विजयी झाले होते. अजित पवारांनी भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्यासह उर्वरित सर्वच उमेदवारांचा दारुण पराभव केला. बारामतीतील सर्वच विरोधी उमेदवारांचं डिपॉझीट जप्त झालं. अजित पवार यांचा राज्यातील प्रथम क्रमांकाच्या मताधिक्याने झालेला विजय कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवणारा ठरला.

बारामतीत शरद पवार यांच्या ‘गोविंदबाग’ या निवासस्थानाजवळच ‘आमच्या येथे डिपॉझिट जप्त करुन मिळेल’ असा मजकूर असलेला अजित पवार यांचं अभिनंदन करणारा फलक लावण्यात आला आहे. आगळ्यावेगळ्या पद्धतीची वाक्यरचना असलेला हा फलक (Ajit Pawar Banner in Baramati) सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.

कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर…

गेल्या महिन्याभरात दुसऱ्यांदा अजित पवार अचानक संपर्काबाहेर गेल्याने चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आपण बारामतीत पवार कुटुंबासोबत वेळ घालवत होतो, असं खुद्द अजित पवार यांनी स्पष्ट केल्याने समर्थकांचा जीव भांड्यात पडला.

निकाल लागून चार दिवस उलटल्यानंतरही अजित पवार माध्यमांसमोर आलेले नव्हते. त्यांनी एकही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. त्यामुळे अजित पवार पुन्हा नाराज झाले आहेत का, अशा चर्चा सुरु झाल्या होत्या.

‘आपण पाडव्याला सर्वांची भेट घेण्यासाठी आलो आहोत. कालही पवार कुटुंबासोबत बारामतीत होतो. आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले नेते, कार्यकर्ते, हितचिंतक या सर्वांना भेटणार आहे’ असं अजित पवार यांनी ‘टीव्ही9 मराठी’ला सांगितलं होतं.

कधी होते नॉट रिचेबल?

24 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. 25 तारखेला रोहित पवारांनी शरद पवारांना भेटून आशीर्वाद घेतला, मात्र तिथंही अजित पवार उपस्थित नव्हते. 26 तारखेला बाळासाहेब थोरांतांनीही पवारांची भेट घेतली.मात्र तिथे फक्त रोहित पवार, सुप्रिया सुळे दिसल्या, अजित पवार तिथंही नव्हते.

राष्ट्रवादीनं प्रतिकूल परिस्थितीतही चांगल्या जागा मिळवल्या. मात्र अजित पवार कुठे आहेत, असा प्रश्न शरद पवारांनाही केला गेला. तेव्हा पवारांनीही उत्तर देणं टाळलं होतं.

बारामतीत अजित पवारांचा डंका, पडळकरांसह सर्वांचंच डिपॉझिट जप्त

अजित पवार निकालाच्या दिवशीही पुढे आले नव्हते. त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनीच जनतेचे आभार मानले होते. महत्त्वाचं म्हणजे गेल्या तीन दिवसांपासून अजित पवार कुठं आहेत, याच्या बातम्या सुरु होत्या. परंतु त्यावर त्यांनी कोणत्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तरही दिलेलं नव्हतं. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा दिवसेंदिवस जोर धरत होत्या.

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.