मुंबईत भाजप उमेदवार रमेश सिंह ठाकूर यांना भाषण करतानाच भोवळ
मालवणी भागात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ठाकूर रमेश सिंह यांची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना व्यासपीठावरच चक्कर आली.
मुंबई : प्रचाराच्या धामधुमीत प्रकृतीकडे केलेलं दुर्लक्ष मुंबईतील भाजप उमेदवाराच्या अंगलट आलं आहे. मालाड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असलेल्या ठाकूर रमेश सिंह (Thakur Ramesh Singh Unconscious) यांना मंचावरच भोवळ आली.
मालवणी भागात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ठाकूर रमेश सिंह भाषण करत होते. मात्र अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना व्यासपीठावरच चक्कर आली. सिंह यांची तात्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आपली प्रकृती स्थिर असल्याची माहिती खुद्द रमेश सिंह ठाकूर यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना दिली.
प्रचाराच्या धामधुमीत प्रकृती, खाणं-पिणं यांच्याकडे केलेलं दुर्लक्ष त्यांच्या तब्येतीवर झाल्याचं दिसत आहे. नवरात्रीचे नऊ दिवस उपवास असल्यामुळे रमेश सिंह ठाकूर यांना त्रास झाला. ठाकूर यांचा दिवस सकाळी लवकर सुरु होतो. तसंच आरामाचा अभावही त्यांच्या दिनक्रमात असतो. ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत असताना उन्हातान्हात केलेला प्रचार ठाकूर यांना त्रासदायक (Thakur Ramesh Singh Unconscious) ठरला.
माझी प्रकृती ठणठणीत, कार्यकर्त्यांनी काळजी करु नये, मला कोणताही त्रास नाही, नवरात्रीच्या उपवासामुळे भोवळ आली असावी, रुग्णालयात गेलो नाही, आता पुन्हा प्रचाराला सुरुवात : रमेश सिंह ठाकूर
रश्मी बागल यांना दुसरा धक्का, भाजपच्या माजी आमदाराचा संजयमामा शिंदेंना पाठिंबा
मालाड पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार अस्लम शेख यांच्याविरोधात रमेश सिंह ठाकूर यांना भाजपतर्फे तिकीट देण्यात आलं आहे. भाजपने तिसऱ्या यादीत रमेश सिंह यांना तिकीट जाहीर केलं होतं.