भोकरमध्ये खासदार चिखलीकरांची एकाकी झुंज, भाजप उमेदवाराच्या प्रचाराला नेत्यांची दांडी
दसऱ्याच्या दिवशी चिखलीकर यांनी दिवसभर गावभेटी आणि बैठका घेत मतदारांशी संवाद साधला. मात्र, स्वत:ला स्थानिक नेते म्हणवून घेणारे अनेक भाजपा नेते पहिल्याच दिवशी प्रचारातून गायब दिसले (BJP Leaders). भोकरमध्ये भाजपने बापूसाहेब गोरठेकर यांना उमेदवारी दिली आहे
नांदेड : भोकर विधानसभा मतदारसंघात भाजपची सर्व धुरा एकट्या प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावरच येऊन पडली आहे (Pratap Patil Chikhalikar campaign). स्थानिकचे भाजप नेते प्रचारात येत नसल्याने एकटे खासदार चिखलीकर हे भोकरमध्ये ठाण मांडून बसले आहेत. दसऱ्याच्या दिवशी चिखलीकर यांनी दिवसभर गावभेटी आणि बैठका घेत मतदारांशी संवाद साधला. मात्र, स्वत:ला स्थानिक नेते म्हणवून घेणारे अनेक भाजपा नेते पहिल्याच दिवशी प्रचारातून गायब दिसले (BJP Leaders). भोकरमध्ये भाजपने बापूसाहेब गोरठेकर यांना उमेदवारी दिली आहे (Bhokar Candidate Bapusaheb Gorthekar).
लोकसभेला पराभूत झाल्यानंतर अशोक चव्हाण हे भोकर मतदारसंघातून विधानसभा लढवत आहेत (Congress Candidate Ashok Chavan). विधानसभेतही पराभवाची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून चव्हाण जिद्दीला पेटले आहेत. त्यातून त्यांनी आपली प्रतिमा बदलत प्रत्येकाची गळाभेट घेणं सुरु केलं आहे. त्यांच्या या अस्त्राचा परिणाम म्हणून अनेकजण त्यांच्याजवळ परतत आहेत. त्यामुळे भोकरमध्ये भाजपचे उमेदवार बापूसाहेब गोरठेकर यांच्या प्रचारापासून अनेकजण सध्या तरी अलिप्त आहेत.
काल (7 ऑक्टोबर) दसऱ्याच्या मुहूर्तावर भोकरमध्ये खासदार चिखलीकर हे प्रचारासाठी उतरले (Pratap Patil Chikhalikar campaign). दिवसभर त्यांनी अनेक गावांना भेटी देत मतदारांशी संवाद साधला. मात्र, यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे कुणीही प्रमुख नेते दिसले नाहीत. माजी खासदार भास्करराव पाटील, आमदार राम पाटील रातोळीकर, माधव किन्हाळकर, राम चौधरी, प्रवीण गायकवाड, नागनाथ घिसेवाड इत्यादी नेते अद्याप प्रचारापासून दूर आहेत. त्यामुळे चिखलीकर एकटेच भोकरची खिंड लढवत आहेत.
लोकसभा निवडणुकीत देखील चिखलीकर यांना अशाच प्रकारचा अनुभव आला होता. आता विधानसभेतही तोच प्रकार घडत असल्याने पक्षाचे नेते नांदेड जिल्ह्यातील या पक्षविरोधी कृत्याची दखल घेणार की नाही हा प्रश्न उपस्थित होतो आहे.
VIDEO :