मी पुन्हा येईन! भाजप मध्यावधी निवडणुकांच्या तयारीला?
कार्यकर्ते, नेते यांना संघटनात्मक बांधणी नव्याने मजबूत करण्याचे आणि वाढवण्याचे आदेश भाजपकडून देण्यात आले आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही सत्तास्थापनेचा दावा करु, असा विश्वास शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची ‘महासेनाआघाडी’ व्यक्त करत आहे. परंतु देवेंद्र फडणवीसांप्रमाणे विधानसभा निवडणुकाही ‘मी पुन्हा येईन’ असं म्हणतील, याची भाजपला खात्री वाटत असावी. कारण संख्याबळाच्या अभावामुळे सत्तास्थापनेचा दावा करण्यास असमर्थता व्यक्त करणाऱ्या भाजपने मध्यावधी निवडणुकांची तयारी (BJP Midterm election Preparation) सुरु केल्याचं चित्र आहे. भाजपने संघटनात्मक बांधणीसाठी आपला कार्यक्रम जाहीर केला आहे.
भाजपने संघटनात्मक पुनर्बांधणीवर भर देण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे. कार्यकर्ते, नेते यांना संघटनात्मक बांधणी नव्याने मजबूत करण्याचे आणि वाढवण्याचे आदेश भाजपकडून देण्यात आले आहेत. मध्यावधी निवडणुका लागल्यास पक्षाने संघटनात्मक तयार रहावं, यासाठी भाजपने तयारी सुरु केल्याचं बोललं जात आहे.
काय आहे कार्यक्रम?
भाजप सक्रिय सदस्य नोंदणी – 10 ते 20 नोव्हेंबर
बूथ अध्यक्ष आणि बूथ समिती सदस्यांची निवड – 15 ते 20 नोव्हेंबर
मंडळ अध्यक्ष आणि मंडळ समिती सदस्य निवड – 25 ते 30 नोव्हेंबर
जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा समिती सदस्यांची निवड – 1 ते 10 डिसेंबर
प्रदेश अध्यक्षांची निवड – 15 डिसेंबर 2019
विजयी आणि पराभूत उमेदवारांची बैठक
दादरमधील वसंत स्मृती कार्यलयात उद्या संध्याकाळी सात वाजता भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला भाजपच्या विधीमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते मार्गदर्शन करणार आहेत. मतदारसंघाचा आढावा घेत संघटनात्मक बांधणीसंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. तर 15 तारखेला सकाळी साडेदहा वाजता आमदार, खासदार आणि जिल्हाप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर 16 तारखेला निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक घेण्यात येणार आहे.
भाजपकडून दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका, भाजप कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रावर मध्यावधी निवडणुका लादू इच्छित नाही : रावसाहेब दानवे
राष्ट्रपती राजवट लागू
राज्यपालांनी राष्ट्रवादीलाही वेळ वाढवून देण्यास नकार देत राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीने मंगळवार 12 नोव्हेंबर 2019 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली.
भाजपच सरकार स्थापन करणार, जे शक्य ते सर्व प्रयत्न करणार : नारायण राणे
राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे (BJP Midterm election Preparation) सरकार स्थापनेचे निकष कठोर झाले आहेत. आता कोणत्याही राजकीय पक्षाला विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाच्या वेळी गैरहजर राहून सत्ताधारी पक्षांना मदत करण्याचा सोयीचा मार्ग बंद झाला आहे. आता किमान 145 आमदारांचा पाठिंबा असल्याशिवाय राज्यपाल कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा आघाडीला सरकार स्थापनेची संधी देणार नाहीत.
भाजपला सद्यपरिस्थितीत 145 हा जादूई आकडा गाठणं अवघड आहे. 105 जागा मिळवलेल्या भाजपला अपक्षांचं गाठोडं जमवून जेमतेम 120 पर्यंत संख्याबळ नेता येत आहे. त्यामुळे सत्तेत येण्यासाठी भाजपला शिवसेनेची साथ घेण्यावाचून पर्याय नव्हता. मात्र अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदावरुन बोलणी अडल्यामुळे भाजपची अडचण झाली.
शिवसेनेने आता आघाडीसोबत जाण्याचा पर्याय चाचपडण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापन होणार असल्यास काँग्रेसला उघड पाठिंबा देणं भाग पडणार आहे. हे त्रिशंकू सरकार अस्तित्वात येणार नाही, अशा विश्वासातूनच भाजपने फेरनिवडणुकांची जुळवाजुळव (BJP Midterm election Preparation) करायला सुरुवात केल्याचं दिसत आहे.