मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातील दुसरा मंत्री ठरवला!

मुख्यमंत्र्यांची (CM Devendra Fadnavis on Jaykumar Gore) काल साताऱ्यातील माण मतदारसंघात प्रचारसभा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपकडून दुसऱ्या मंत्र्यांची एकप्रकारे अप्रत्यक्ष घोषणा केली.

मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातील दुसरा मंत्री ठरवला!
Follow us
| Updated on: Oct 11, 2019 | 1:20 PM

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis on Jaykumar Gore Ministry ) हे राज्यभर सभांचा धुरळा उडवत आहेत. जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन मुख्यमंत्री विकासकामांची आश्वासनं देत आहेत. मुख्यमंत्र्यांची (CM Devendra Fadnavis on Jaykumar Gore Ministry ) काल साताऱ्यातील माण मतदारसंघात प्रचारसभा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपकडून दुसऱ्या मंत्र्यांची एकप्रकारे अप्रत्यक्ष घोषणा केली. माण खटाव मतदारसंघातील भाजप उमेदवार जयकुमार गोरे (Jaykumar Gore vs Shekhar Gore) यांना निवडून द्या, त्यांना मंत्रिपद देऊ, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

त्याआधी मुख्यमंत्र्यांनी कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे (Ram Shinde) यांना जेवढ्या जास्त मतांनी निवडून द्याल, तेवढं मोठं मंत्रिपद देऊ असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राम शिंदेंनंतर आता दुसरा मंत्री ठरवल्याचं चित्र आहे.

जयकुमार गोरे यांना जर चांगल्या मताधिक्याने निवडून दिलं, तर मी त्यांना मंत्रिपद देईन, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी म्हसवड येथील सभेत दिला.

सख्खे भाऊ एकमेकांविरोधात

सातारा जिल्ह्यात सर्वात चर्चेचा विधानसभा मतदारसंघ म्हणून माण मतदार संघाकडे पाहिले जात आहे. कारण इथे सख्खे भाऊ जयकुमार आणि शेखर गोरे हे एकमेकांविरोधात उभे आहेत. महत्त्वाचं भाजप-शिवसेना यांची युती असूनही दोघे भाऊ मात्र दोन्ही पक्षांकडून रिंगणात आहेत. शेखर गोरे यांना शिवसेनेने तिकीट दिलं आहे.

म्हसवड येथील भाजपच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी आपल्या मित्रपक्षावर निशाणा साधत, कमळ चिन्हावर मतदान करा असे आवाहन केलं. इथे भाजप विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होत आहे.

“जयकुमार गोरेंना चांगल्या मताधिक्याने निवडुन आणा. काही लोक सांगतात की माझा तुम्हाला अशिर्वाद आहे (शिवसेना) पण देवेंद्र फडणवीस यांची साथ आणि अशिर्वाद फक्त कमळाला आहे फक्त कमळाला…कमळा शिवाय काही नाही केवळ कमळाला…..” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राम शिंदेंनाही मंत्रिपदाचं आश्वासन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) यांनी अहमदनगरमध्ये महा जनादेश यात्रेत बोलताना राम शिंदे यांना पुन्हा मंत्री करण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राम शिंदे यांना जेवढे जास्त मते मिळतील तेवढे मोठे मंत्रीपद देऊ, असंही म्हटलं होतं.

संबंधित बातम्या 

राम शिंदे निवडूनच येणार नाही, तर त्यांना मंत्री कसं करणार? : जयंत पाटील  

Non Stop LIVE Update
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....
'..त्यांच्या पाय चाटण्याला आक्षेप', देवेंद्र फडणवीस ठाकरेंवर भडकले अन्
'..त्यांच्या पाय चाटण्याला आक्षेप', देवेंद्र फडणवीस ठाकरेंवर भडकले अन्.
प्रचाररॅलीत कार्यकर्त्यांनी उडवले फटाके अन् ठिणगीन उमेदवाराचे केस जळले
प्रचाररॅलीत कार्यकर्त्यांनी उडवले फटाके अन् ठिणगीन उमेदवाराचे केस जळले.
चित्रा वाघ यांचं ट्वीट खरं की खोटं? नितीन राऊतांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर
चित्रा वाघ यांचं ट्वीट खरं की खोटं? नितीन राऊतांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर.
मनसेनं 'खुर्ची' टाकली, संजय राऊत 'खाट' टाकणार, राज ठाकरेंवर निशाणा
मनसेनं 'खुर्ची' टाकली, संजय राऊत 'खाट' टाकणार, राज ठाकरेंवर निशाणा.
पवारांच्या पत्नीला कंपनीत रोखलं, अर्धा तास खोळंबा अन्... काय घडलं?
पवारांच्या पत्नीला कंपनीत रोखलं, अर्धा तास खोळंबा अन्... काय घडलं?.
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.