खडसेंचा फडणवीसांवर पहिला थेट हल्ला, ओबीसींना डावलले, पंकजा आणि रोहिणी खडसेंना पाडले

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Eknath Khadses attack on Devendra Fadnavis) यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे.

खडसेंचा फडणवीसांवर पहिला थेट हल्ला, ओबीसींना डावलले, पंकजा आणि रोहिणी खडसेंना पाडले
Follow us
| Updated on: Dec 04, 2019 | 6:59 PM

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Eknath Khadses attack on Devendra Fadnavis) यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. जे यशाचं श्रेय घेतात, त्यांनी पराभवाचं पण घ्यावं, ज्यांनी नेतृत्व केलं, त्यांनी ती जबाबदारी घ्यावी, असं एकनाथ खडसे म्हणाले. इतकंच नाही तर भाजपने ओबीसी नेत्यांना डावललं, एकतर त्यांना तिकीट दिलं नाही आणि ज्यांना तिकीट दिलं त्यांना भाजपमधील गटाने पाडलं, असा हल्लाबोल खडसेंनी केला. (Eknath Khadses attack on Devendra Fadnavis)

खडसेंनी आज पंकजा मुंडे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. या भेटीनंतर एकनाथ खडसेंनी माध्यमांशी संवाद साधला.

खडसे म्हणाले, “पंकजाताईंची भेट ही कौटुंबीक भेट होती. गोपीनाथ मुंडे हे माझे चांगले मित्र होते. पंकजाताई आणि रोहिणीताईंचा पराभव झाला, त्या कारणांवर चर्चा झाली. ज्यांनी पक्षाविरोधी कामगिरी केली, त्यांची नावं वरिष्ठांकडे पाठवली आहेत, आता कारवाईची प्रतीक्षा आहे”

पक्षाविरोधी कामं करणाऱ्यांची नावं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवली आहेत, त्यांनी चौकशी करुन विरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करावी. जे घडलं आहे, पक्षामध्ये जी अस्वस्थता आहे ती मी वरिष्ठांना कळवली आहे असं एकनाथ खडसे म्हणाले.

बहुजन नेतृत्त्वाला डावलणं हे दुर्दैवाने घडलं आहे. तिकीटं न देणे किंवा त्यांना पाडणे हे घडलं आहे. 105 जण निवडून आले, पण जर नीट नियोजन केलं असतं तर भाजपचे आणखी आमदार निवडून आले असते, असं एकनाथ खडसे म्हणाले.

खालच्या माणसांना बोलण्यात अर्थ नाही. ज्यांनी हे निर्णय घेतले त्यांनाच दोष द्यावा लागेल. पक्ष यातील दोषी नसतो. पक्षाचं नेतृत्व करणारे जसं यशाचे भागिदार होतात, तसं त्यांनी अपयशाचे भागिदारही व्हावं. यश मिळालं तर माझ्यामुळे आणि अपयश मिळालं तर दुसऱ्यामुळे हे माझ्या 40 वर्षांच्या राजकीय जीवनात आम्ही कधी शिकलो नाही. आमच्यावेळी देखील अपयश आलं, त्याला आम्हीही तोंड दिलं आहे. त्यावेळी आम्ही ते अपयश मान्य केलं.

लोकांनी महायुतीला मतदान केलं होतं, महायुतीचाच मुख्यमंत्री व्हायला हवा होता, शिवसेनेला एक-दोन वर्ष मुख्यमंत्रिपद दिलं असतं, तरी प्रश्न सुटला असता, असंही एकनाथ खडसे म्हणाले.

नाराजांची मोट बांधण्याची आवश्यकता नाही. पक्षातील जे नेते अस्वस्थ आणि नाराज आहेत ते आपोआपच एकत्र होतात.- एकनाथ खडसे

कोणत्याही सरकारचं किंवा विरोधकांच्या कामकाजाचं मूल्यांकन केवळ 8 दिवसात करता येणार नाही, देवेंद्रजी विरोधी पक्षनेते झाले त्यांचं अभिनंदन, उद्धवजी मुख्यमंत्री झालेत त्यांचं अभिनंदन, असं एकनाथ खडसेंनी नमूद केलं.

शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाबाबत खडसेंचं मत मला वाटतं जनतेने महायुतीला मतदान केलं होतं. शिवसेना आणि भाजपमध्ये समन्वय होऊन चर्चा झाली असती, दोन पावलं मागे घेतली असती, तर महायुतीचाच मुख्यमंत्री झाला असता. शिवसेनेची एक-दोन वर्ष मुख्यमंत्रिपदाची मागणी मान्यही केली असती, तरी चर्चेतून मार्ग निघू शकला असता. माझा रोख माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जो नेतृत्व करतो आहे त्याच्याकडे आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.