शिवसेनेच्या विरोधाचा संबंध नाही, येत्या काही दिवसात मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करेन : नारायण राणे

महाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात असताना मुख्यमंत्र्यांचे स्वागत स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणेंकडून करण्यात आले. मी लवकरच भाजपवासी होणार असल्याचंही नारायण राणेंनी (Narayan Rane Join BJP) यावेळी सांगितले.

शिवसेनेच्या विरोधाचा संबंध नाही, येत्या काही दिवसात मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करेन : नारायण राणे
Follow us
| Updated on: Sep 17, 2019 | 7:08 PM

सिंधुदुर्ग : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ठिकठिकाणी महाजनादेश यात्रेचे (BJP Maha janadesh Yatra) आयोजन करण्यात येत आहे. आज (17 सप्टेंबर) कणकवलीत मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी महाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात असताना मुख्यमंत्र्यांचे स्वागत स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणेंकडून (Narayan Rane Join BJP) करण्यात आले. मी लवकरच भाजपवासी होणार असल्याचंही नारायण राणेंनी (Narayan Rane Join BJP) यावेळी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलिन (Narayan Rane Join BJP) करणार आहेत. राणेंसोबतच त्यांचे दोन्ही चिंरजीव निलेश आणि नितीश राणेही भाजपात जाणार आहेत. मात्र त्यापूर्वी राणे पिता-पुत्रांकडून सिंधुदुर्गात महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सिंधुदुर्गात येत असताना त्यांचे स्वागत करणे हे माझे कर्तव्य आहे. मी लवकरच भाजप प्रवेश करणार असल्याने भविष्याकडे पाहून मी त्यांचे स्वागत केले. मातोश्रीच्या दृष्टीकोनातून त्यांचा सन्मान करावा, स्वागत करावं या स्तुत्य भावनेने मी त्यांचे स्वागत केले, असे नारायण राणे यांनी सांगितले

यावेळी पत्रकारांनी त्यांना तुमचा भाजपप्रवेश कधी होणार असे विचारले असता, त्यावेळी नारायण राणे म्हणाले. “माझा भाजपत प्रवेश हा मुंबईत व्हावा अशी इच्छा मी प्रगट केली आहे. येत्या काही दिवसात माझा भाजपात प्रवेश होईल. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधात काही प्रश्न नाही.” “शिवसेना-भाजप युतीमध्ये काहीही झाले. तरी माझा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. त्यामुळे माझा भाजप प्रवेश निश्चित आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.