अजित पवार म्हणाले शेती-उद्योग करा, जय पवारची विधानसभेच्या तोंडावर मोठी घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar Son Jay Pawar) यांनी मुलांना राजकारणात न येता शेती किंवा उद्योग व्यवसाय करण्याचा सल्ला दिला होता.
बारामती (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar Son Jay Pawar) यांनी मुलांना राजकारणात न येता शेती किंवा उद्योग व्यवसाय करण्याचा सल्ला दिला होता. अजित पवारांचा हा सल्ला त्यांचा लहान मुलगा जय पवारने (Ajit Pawar Son Jay Pawar) चांगलाच मनावर घेतल्याचं दिसत आहे. जय पवारने मी राजकारणात आलो तरी कोणतीही निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा केली आहे. जय पवारने टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला.
जय पवार सध्या बारामतीत प्रचारात व्यस्त आहे. वडील अजित पवार यांच्या प्रचाराची धुरा जय पवार सांभाळत आहे. जय पवारच्या उपस्थितीत बारामती शहरात काल पदयात्रा काढून अजित पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी जय पवारने आपण राजकारणात आलो तरी कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं. “तीन चार वर्षापासून माझ्या राजकारणाच्या प्रवेशाची चर्चा सुरु आहे. जरी मी राजकारणात उतरलो तरी मी पक्षाचं कोणतं तरी पद घेऊन, सामान्य माणसांसाठी काम करेन, पण मी कोणतीही निवडणूक लढणार नाही” असं जय पवारने सांगितलं.
पवार कुटुंबियांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. शरद पवार यांना नाहक गोवलं जातंय. पवारांना राजकीय महत्व असल्यानं सत्ताधारी खेळी करत असल्याचा आरोप जय पवारने केला.
अजित पवारांचा मुलांना सल्ला
दरम्यान, अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते अज्ञातस्थळी गेले होते. त्यांचा कुणाशीही संपर्क नव्हता. केवळ त्यांनी मुलगा पार्थशी फोनवरुन संवाद साधून राजकारणात न आलेलं बरं, राजकारणाऐवजी व्यवसाय केलेला बरा, असा सल्ला दिला होता. तीच माहिती शरद पवारांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली होती.
शरद पवार म्हणाले होते, “लढाई सोडण्याचा अजित पवारांचा स्वभाव नाही, माझ्यावर कारवाई झाली म्हणूनच त्यांनी राजीनामा दिला. कधीही नोटीस न आलेल्या काकांनाही (शरद पवारांना) नोटीस आली, त्यामुळे राजकारणात न आलेलं बरं, राजकारणाऐवजी व्यवसाय केलेला बरा, असा सल्ला अजित पवारांनी मुलाला सल्ला दिला.”
अजित पवारांचा राजीनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar resigns ) यांनी शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांचा (Ajit Pawar resigns ) राजीनामा मंजूर केला. अजित पवारांचा राजीनामा मंजूर केल्याची माहिती हरिभाऊ बागडे यांनी टीव्ही 9 मराठीला दिली.
संबंधित बातम्या
वडिलांचा राजीनामा, अजित पवारांचा धाकटा मुलगा पूरग्रस्त दौऱ्यावर, जय पवार म्हणतात….