पालघरमधील मतदानकेंद्रावर मतदारांचा बहिष्कार, चार तासात केवळ दोघांचं मतदान

केळवे रोड पूर्वेकडील झांजरोळी मतदान केंद्रावर सकाळी अकरा वाजेपर्यंत फक्त दोन मतदारांनी मतदान केलं.

पालघरमधील मतदानकेंद्रावर मतदारांचा बहिष्कार, चार तासात केवळ दोघांचं मतदान
Follow us
| Updated on: Oct 21, 2019 | 2:27 PM

पालघर : पालघरमधील केळवे रोड परिसरात मतदानकेंद्रावर मतदारांनी कडकडीत बहिष्कार (Kelve Road Voters boycott) टाकला. सकाळी अकरा वाजेपर्यंत केवळ दोनच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

केळवे रोड पूर्वेकडील झांजरोळी मतदान केंद्रावर सकाळी अकरा वाजेपर्यंत फक्त दोन मतदारांनी मतदान केलं. यामध्ये एका पुरुष आणि एका स्त्री मतदाराचा समावेश आहे. झांजरोळी मतदान केंद्रांवर शुकशुकाट पसरला आहे.

प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. त्यामुळे मतदानासाठी घराबाहेर न पडता मतदारांनी घरात राहणंच पसंत केलं.

केळवे रोड पूर्वेकडील नागरिकांनी वाहतुकीसाठी उड्डाणपुलाची मागणी उचलून धरली आहे. मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी केळवे रोड पूर्वेकडील गावांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे. यामुळे या पट्ट्यातील नऊ मतदान केंद्रांवर बहिष्काराचं सावट कायम आहे.

महाराष्ट्राला लागलेली धूळ आणि घाण पाऊस वाहून नेईल : अविनाश जाधव

या दरम्यान प्रशासनाने जमावबंदी लागू केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण (Kelve Road Voters boycott) असल्याचंही बोललं जातं.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Vidhansabha Election Voting) राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे, तर येत्या 24 तारखेला (गुरुवार 24 ऑक्टोबर 2019) निवडणुकांचे निकाल हाती येतील. 3 हजार 237 उमेदवारांचं भवितव्य मतदानयंत्रांमध्ये बंदिस्त होणार आहे.

राज्यभरात सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील भाग असल्यामुळे सकाळी 7 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंतच मतदान होईल

पक्षनिहाय उमेदवार

बसप – 262 भाजप – 164 काँग्रेस – 147 शिवसेना – 126 राष्ट्रवादी – 121 मनसे – 101 भाकप – 16 माकप – 8 इतर पक्ष – 892 अपक्ष – 1400

एकूण मतदार

• महाराष्ट्रात पुरुष, महिला, तृतीयपंथी, दिव्यांग असे एकूण 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार. •पुरुष मतदार – 4 कोटी 68 लाख 75 हजार 750 •महिला मतदार – 4 कोटी 28 लाख 43 हजार 635 •तृतीयपंथी मतदार – 2 हजार 634

मतदारांचा वयोगट

18 ते 25 – 1,06,76,013 25 ते 40 – 3,13,13,396 40 ते 60 – 3,25,39,026 60 पेक्षा जास्त – 1,51,93,584

मतदान केंद्रे

मतदान केंद्रे – 96 हजार 661 मुख्य मतदान केंद्रे – 95, 473 सहायक मतदान केंद्रे – 1,188 सखी मतदान केंद्रे – 352. महिलांसाठी, महिलांकडून संनियंत्रण आणि व्यवस्थापनावर भर

(Kelve Road Voters boycott)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.