आघाडीकडून मंत्रिपद भूषवलेल्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

भाजपला 9 अपक्षांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे त्यांचं संख्याबळ 105 वरुन 114 जागांवर पोहोचलं आहे.

आघाडीकडून मंत्रिपद भूषवलेल्या आमदाराचा भाजपला पाठिंबा
Follow us
| Updated on: Oct 30, 2019 | 4:09 PM

मुंबई : शिवसेना-भाजपमध्ये अपक्ष आमदारांचा पाठिंबा (Independent MLAs Support) मिळवण्यासाठी चढाओढ सुरु आहे. कोणे एके काळी महाआघाडीच्या गोटात असलेल्या ‘जनसुराज्य शक्ती’ने भाजपला पाठिंबा (Jansurajya Party supports BJP) दिला आहे. त्यामुळे भाजपचं संख्याबळ 114 वर पोहचलं आहे.

‘जनसुराज्य शक्ती’चे नेते आणि शाहूवाडी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉ. विनयकुमार कोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि भाजप सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला. विनय कोरे यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार सत्यजीत पाटील यांचा पराभव केला.

शिवसेनेला आतापर्यंत 6 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 56 वरुन 62 वर पोहोचलं आहे. तर दुसरीकडे भाजपलाही 9 अपक्षांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे त्यांचं संख्याबळ 105 वरुन 114 जागांवर पोहोचलं आहे.

यापूर्वी अपक्ष आमदार महेश बालदी, विनोद अग्रवाल, गीता जैन, किशोर जोरगेवार, राजेंद्र राऊत, श्यामसुंदर शिंदे, युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.

भाजपला पाठिंबा दिलेले आमदार

  1. महेश बालदी – उरण (रायगड)
  2. विनोद अग्रवाल – गोंदिया (गोंदिया)
  3. गीता जैन – मीरा भाईंदर (ठाणे) – (भाजप बंडखोर)
  4. किशोर जोरगेवार – चंद्रपूर (चंद्रपूर)
  5. रवी राणा – बडनेरा (अमरावती)
  6. राजेंद्र राऊत – बार्शी (सोलापूर)
  7. श्यामसुंदर शिंदे – <पक्ष – शेकाप> लोहा (नांदेड) – (भाजप बंडखोर)
  8. रत्नाकर गुट्टे – <पक्ष – रासप> – गंगाखेड (परभणी)
  9. विनय कोरे – <पक्ष – जनसुराज्य पक्ष> – शाहूवाडी (कोल्हापूर)

शिवसेनेला पाठिंबा दिलेले आमदार

  1. आशिष जयस्वाल – रामटेक (नागपूर)
  2. नरेंद्र भोंडेकर – भंडारा (भंडारा)
  3. बच्चू कडू – <पक्ष – प्रहार संघटना> – अचलपूर (अमरावती)
  4. राजकुमार पटेल – <पक्ष – प्रहार संघटना> – मेळघाट (अमरावती)
  5. शंकरराव गडाख – <पक्ष – क्रांतिकारी शेतकरी पक्ष> – नेवासा (अहमदनगर)
  6. मंजुषा गावित – साक्री, धुळे (भाजप बंडखोर)

अद्याप कोणालाही पाठिंबा जाहीर न केलेले अपक्ष आमदार

  1. चंद्रकांत पाटील – मुक्ताईनगर, जळगाव (शिवसेना बंडखोर)
  2. प्रकाश आवाडे – इचलकरंजी, कोल्हापूर (काँग्रेस बंडखोर)
  3. राजेंद्र पाटील यड्रावकर – शिरोळ, कोल्हापूर (राष्ट्रवादी बंडखोर)
  4. संजय शिंदे – करमाळा, सोलापूर (राष्ट्रवादी बंडखोर)

यांचा पाठिंबा कोणाला?

  1. मनसे – 01
  2. माकप – 01
  3. एमआयएम – 02

कोणालाही बहुमत नाही

विधानसभा निवडणुकीत भाजपने 288 पैकी 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या, राष्ट्रवादी 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 जागांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे सत्ता स्थापन्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे.

अपक्षांची खेचाखेची, भाजप-शिवसेनेचं संख्याबळ कितीवर?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 पक्षीय बलाबल (Maharashtra Vidhansabha Election Partywise Result)

  • भाजप – 105
  • शिवसेना – 56
  • राष्ट्रवादी – 54
  • काँग्रेस – 44
  • बहुजन विकास आघाडी – 03 (महाआघाडी)
  • प्रहार जनशक्ती – 02 (शिवसेनेला पाठिंबा)
  • एमआयएम – 02
  • समाजवादी पक्ष – 02 (महाआघाडी)
  • मनसे – 01
  • माकप – 01
  • जनसुराज्य शक्ती – 01 (भाजपला पाठिंबा)
  • क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01 (शिवसेनेला पाठिंबा)
  • शेकाप – 01 (भाजपला पाठिंबा)
  • रासप – 01 (भाजपला पाठिंबा)
  • स्वाभिमानी – 01 (महाआघाडी)
  • अपक्ष – 13
  • एकूण – 288

महायुती – 162

(भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)

महाआघाडी – 105

(राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01) <भाजपला पाठिंबा>, स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02)

Jansurajya Party supports BJP
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.