महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : सचिन तेंडुलकर, अमोल कोल्हे, धनंजय मुंडेंचं मतदान
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Vidhansabha Election Voting) राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर येत्या 24 तारखेला (गुरुवार 24 ऑक्टोबर 2019) निवडणुकांचे निकाल हाती येतील.
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रातील मतदार, उमेदवार आणि राजकीय दिग्गज ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो लोकशाहीच्या महाउत्सवाचा दिवस अखेर उजाडला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Vidhansabha Election Voting) राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे, तर येत्या 24 तारखेला (गुरुवार 24 ऑक्टोबर 2019) निवडणुकांचे निकाल हाती येतील. प्रचारतोफा थंडावल्यानंतर उमेदवारांची वाढलेली धाकधूक शिगेला पोहचली असून 3 हजार 237 उमेदवारांचं भवितव्य मतदानयंत्रांमध्ये बंदिस्त होणार आहे.
[svt-event title=”नाना पाटेकर यांचं मतदान” date=”21/10/2019,2:44PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | अभिनेते नाना पाटेकर यांचं मतदानhttps://t.co/eIKj4Eop7R #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/c3VXPZqLMh
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”स्मृती इराणी यांचं मतदान” date=”21/10/2019,2:34PM” class=”svt-cd-green” ]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचं मतदान https://t.co/pBbBn0Xdyw #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/vMwrRUQMWO
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”जयंत पाटील यांचं सहकुटुंब मतदान” date=”21/10/2019,12:46PM” class=”svt-cd-green” ]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं इस्लामपूरमध्ये सहकुटुंब मतदान https://t.co/pBbBn1eOX6 #MaharashtraAssemblyPolls @Jayant_R_Patil pic.twitter.com/jkJmMzq37I
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”उर्मिला मातोंडकरचं मतदान” date=”21/10/2019,12:43PM” class=”svt-cd-green” ]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचं मतदान https://t.co/pBbBn0Xdyw #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/Vc9binjrr0
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”धनंजय मुंडे यांचं मतदान” date=”21/10/2019,12:24PM” class=”svt-cd-green” ]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांचं मतदान https://t.co/pBbBn0Xdyw #MaharashtraAssemblyPolls @dhananjay_munde pic.twitter.com/9sTiET5uma
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event][svt-event title=”डॉ. अमोल कोल्हे यांचं मतदान” date=”21/10/2019,12:24PM” class=”svt-cd-green” ]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचं मतदान https://t.co/pBbBn0Xdyw #MaharashtraAssemblyPolls @kolhe_amol pic.twitter.com/vgBavyWbXg
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”सचिन तेंडुलकरचं पत्नी-मुलांसह मतदान” date=”21/10/2019,12:23PM” class=”svt-cd-green” ]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं सहकुटुंब मतदान https://t.co/pBbBn0Xdyw #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/djskZid3GP
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”राणे कुटुंबाचं मतदान” date=”21/10/2019,12:23PM” class=”svt-cd-green” ]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : नारायण राणे यांचं सहकुटुंब मतदान https://t.co/pBbBn0Xdyw #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/EgbekRNG5X
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”उद्धव ठाकरे सहकुटुंब रांगेत” date=”21/10/2019,12:22PM” class=”svt-cd-green” ]
#MaharashtraElections2019 – मतदानासाठी ठाकरे कुटुंब रांगेत, वांद्र्यात उद्धव ठाकरेंचं सहकुटुंब मतदान @dineshdukhande @AUThackeray pic.twitter.com/CO3QnZzWhw
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”ठाकरे कुटुंबाचं मतदान” date=”21/10/2019,11:22AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं मतदान https://t.co/eIKj4Eop7R #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/oyiwt9uUsr
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”मतदानानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया” date=”21/10/2019,11:14AM” class=”svt-cd-green” ]
महाराष्ट्रातील सर्वात मोठा महोत्सव आज आहे, मी सहकुटुंब मतदान केलंय, मतदारांनीसुद्धा मोठ्या संख्येनं बाहेर पडून मतदान करावं, लोकशाहीत आपण ज्यांना निवडतो त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या असतात.- मुख्यमंत्री
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”अशोक चव्हाणांचं मतदान” date=”21/10/2019,11:13AM” class=”svt-cd-green” ]
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पत्नी अमिता चव्हाण यांचं नांदेडमध्ये मतदान pic.twitter.com/SEiORll58N
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”करमाळ्यात मतदानाला गालबोट” date=”21/10/2019,11:13AM” class=”svt-cd-green” ]
सोलापूर: करमाळ्यात मतदानला गालबोट, अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांची शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण, रक्ताच्या थारोळ्यातील कार्यकर्ता गंभीर जखमी pic.twitter.com/dw4oDFoH75
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”राज ठाकरे यांचं मतदान” date=”21/10/2019,11:13AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | राज ठाकरे यांचं सहकुटुंब मतदान pic.twitter.com/x04aoWpG6u
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”राज ठाकरे सिद्धिविनायकाला” date=”21/10/2019,10:52AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | राज ठाकरे सिद्धिविनायकाच्या चरणी pic.twitter.com/4upaYPgPQG
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर” date=”21/10/2019,10:50AM” class=”svt-cd-green” ]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : पंकजा मुंडे मतदानापूर्वी गोपीनाथ गडावर https://t.co/pBbBn0Xdyw #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/y9O2tpgykA
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”माधुरी दीक्षितचं मतदान” date=”21/10/2019,10:52AM” class=”svt-cd-green” ]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : अभिनेत्री माधुरी दीक्षितने बजावला मतदानाचा हक्क https://t.co/pBbBn0Xdyw #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/9RiYOTGhoR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”मुख्यमंत्री आणि मिसेस मुख्यमंत्र्यांचं मतदान” date=”21/10/2019,10:46AM” class=”svt-cd-green” ]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पत्नी आणि मातोश्रींसह नागपुरात मतदान https://t.co/pBbBn0Xdyw #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/p6iEf4cBNg
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”बाळासाहेब थोरातांचं सहकुटुंब मतदान” date=”21/10/2019,10:45AM” class=”svt-cd-green” ]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचं संगमनेरमध्ये कुटुंबियांसह मतदान https://t.co/pBbBn0Xdyw #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/i0te9981sB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”यवतमाळचे उत्साही मतदार” date=”21/10/2019,10:39AM” class=”svt-cd-green” ]
यवतमाळ : वणी मतदारसंघाती मतदानासाठी उत्साही मतदार चक्क घोड्यावर pic.twitter.com/WSjCgmnBB4
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”राज ठाकरे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला” date=”21/10/2019,10:31AM” class=”svt-cd-green” ]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब सिद्धिविनायकाच्या दर्शनाला रवाना, बाप्पाच्या दर्शनानंतर मतदानाचा हक्क बजावणार https://t.co/pBbBn0Xdyw #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/DzPN4VHmiB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”9 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी” date=”21/10/2019,10:24AM” class=”svt-cd-green” ]
राज्यात 9 वाजेपर्यंत केवळ 5 टक्के मतदान ?कोल्हापूर – 9.36 % ?अकोला – 5.02 % ?ठाणे – 5 % ?वाशिम – 6 % ?हिंगोली – 5.75 % ?जुन्नर – 22 % ?सोलापूर – 3.57 % https://t.co/keWA0hpQyp pic.twitter.com/zXjgHYJibb
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”मी उमेदवार नसल्याने धाकधूक कमी : खडसे” date=”21/10/2019,10:20AM” class=”svt-cd-green” ]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : कन्या रोहिणी खडसे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात, स्वतः उमेदवार नसल्यामुळे धावपळ कमी, जळगावहून एकनाथ खडसे लाईव्ह https://t.co/pBbBn0Xdyw #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/d6s4mJrxaS
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”एकनाथ खडसे मतदानासाठी रांगेत” date=”21/10/2019,10:13AM” class=”svt-cd-green” ]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मतदानासाठी रांगेत https://t.co/pBbBn0Xdyw #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/l673VNr18y
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”लारा दत्ता-महेश भूपतीचं मतदान” date=”21/10/2019,10:08AM” class=”svt-cd-green” ]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : अभिनेत्री लारा दत्ताचं पती महेश भूपतीसह मतदान https://t.co/pBbBn0Xdyw #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/EPwaBbzz3J
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”आमीर खानचं मतदान” date=”21/10/2019,10:06AM” class=”svt-cd-green” ]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE – अभिनेता आमीर खान याचं वांद्रे पश्चिममध्ये मतदान https://t.co/pBbBn0Xdyw #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/i05aYGgM5d
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”अमरावतीत ‘स्वाभिमानी’च्या उमेदवाराची गाडी जाळली” date=”21/10/2019,10:03AM” class=”svt-cd-green” ]
अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार देवेंद्र भुयार यांची गाडी जाळली, वरुड मतदारसंघातील घटना https://t.co/pBbBn0Xdyw #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/gJJtM4w5xx
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event] [svt-event title=”सकाळी 9 वाजेपर्यंत कुठे किती टक्के मतदान?” date=”21/10/2019,9:59AM” class=”svt-cd-green” ]
सकाळी 9 वाजेपर्यंत कुठे किती टक्के मतदान?
मुंबई शहर – 5% मुंबई उपनगर 26 मतदारसंघात- 5.64 % ठाणे जिल्हा : 5% वाशिम- 6% नाशिक : दिंडोरी 13:20% नाशिक : बागलाण 4% नंदुरबार – 6 %https://t.co/keWA0hpQyp pic.twitter.com/4P0cTt8Tfk
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”शरद पवार यांचं मतदान” date=”21/10/2019,9:55AM” class=”svt-cd-green” ]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क https://t.co/pBbBn0Xdyw #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/nCwhojSNB7
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”लातूरकरांचा उत्तम प्रतिसाद : जेनेलिया देशमुख” date=”21/10/2019,9:47AM” class=”svt-cd-green” ]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : जेनेलिया देशमुख यांची मतदानानंतर टीव्ही9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह बातचीत https://t.co/pBbBn0Xdyw #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/XgPfDY9el7
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”नंदुरबारमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत किती टक्के मतदान” date=”21/10/2019,9:41AM” class=”svt-cd-green” ]
BREAKING – नंदूरबारमध्ये सकाळी 9 पर्यंत मतदानाची टक्केवारी –
?नवापूर मतदारसंघात – 7.58 टक्के मतदान
?अक्कलकुवा मतदारसंघात- 6.56 टक्के मतदान
?नंदूरबार – नंदूरबार मतदारसंघात पहिल्या दोन तासात अवघे 1.25 टक्के मतदान
?शहादा मतदारसंघात सकाळी 9 पर्यंत 7.98 टक्के मतदान pic.twitter.com/ySL0YmIL20
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”जेनेलिया देशमुख यांचं लातूरमध्ये मतदान” date=”21/10/2019,9:40AM” class=”svt-cd-green” ]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांचं लातूरमध्ये मतदान, तर खासदार पूनम महाजन यांनी मुंबईत बजावला मतदानाचा हक्क https://t.co/pBbBn0Xdyw #MaharashtraAssemblyPolls @geneliad @poonam_mahajan pic.twitter.com/OZeOb0TfNl
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”जानकरांचं मातोश्रींसह मतदान” date=”21/10/2019,9:24AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | रासप अध्यक्ष महादेव जानकर यांचं मातोश्रींसह मतदानhttps://t.co/eIKj4Eop7R #AssemblyElections2019 pic.twitter.com/2f66FxrKkz
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”उदयनराजे यांचं सहकुटुंब मतदान” date=”21/10/2019,9:20AM” class=”svt-cd-green” ]
उदयनराजे यांचं सहकुटुंब मतदान pic.twitter.com/8qdpAjYkmt
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”मतदानानंतर संपूर्ण पवार कुटुंब” date=”21/10/2019,9:17AM” class=”svt-cd-green” ]
बारामतीमधून पवार कुुटुंबाचा इलेक्शन सेल्फी pic.twitter.com/X0O7jcyTTh
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”गिरीश महाजन सहकुुटुंब मतदानाला” date=”21/10/2019,9:03AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | गिरीश महाजन यांचं सहकुटुंब मतदानhttps://t.co/eIKj4Eop7R #AssemblyElections2019 pic.twitter.com/Ha7xgkapLO
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”किरीट सोमय्या सहकुटुंब मतदानाला” date=”21/10/2019,9:01AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | किरीट सोमय्या यांचं सहकुटुंब मतदानhttps://t.co/eIKj4Eop7R #AssemblyElections2019 pic.twitter.com/42eak8VK3i
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”मेणबत्तीच्या प्रकाशात मतदान सुरु” date=”21/10/2019,8:59AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | पुण्यातील शिवाजीनगर विद्याभवन मतदारकेंद्रावर बत्ती गुल, मेणबत्तीच्या प्रकाशात मतदान सुरुhttps://t.co/eIKj4Eop7R #AssemblyElections2019 pic.twitter.com/j6BEpxU5t8
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”प्रफुल्ल पटेल मतदानाला” date=”21/10/2019,8:55AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल मतदानालाhttps://t.co/eIKj4Eop7R #AssemblyElections2019 pic.twitter.com/4z9qnK3CQc
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”किशोरी शहाणेंचं मतदान” date=”21/10/2019,8:54AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | अभिनेत्री किशोरी शहाणे-वीज यांचं सहकुटुंब मतदानhttps://t.co/eIKj4Eop7R #AssemblyElections2019 pic.twitter.com/vbmoQJOhAJ
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”प्रशांत दामले यांचं मतदान” date=”21/10/2019,8:47AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | दिग्गज अभिनेते प्रशांत दामले यांनी बजावला मतदानाचा हक्क https://t.co/eIKj4Eop7R #AssemblyElections2019 @prashant_damle pic.twitter.com/hvHhk4nyOs
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”चंद्रकांत पाटील मतदानाला” date=”21/10/2019,8:44AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | चंद्रकांत पाटील मतदानासाठी रांगेतhttps://t.co/eIKj4Eop7R #AssemblyElections2019 pic.twitter.com/YMxX8JznvR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”आमचंच सरकार येणार : सुप्रिया सुळे” date=”21/10/2019,8:36AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | यंदा आमचंच सरकार येणार : सुप्रिया सुळेhttps://t.co/eIKj4Eop7R #AssemblyElections2019 @supriya_sule pic.twitter.com/vltaT8Ki91
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”नितीन गडकरींचं मतदान” date=”21/10/2019,8:18AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं सपत्नीक मतदानhttps://t.co/eIKj4Eop7R #AssemblyElections2019 @nitin_gadkari pic.twitter.com/6aipYGZMUI
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”सुप्रिया सुळे मतदानाला” date=”21/10/2019,8:17AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे मातोश्री प्रतिभा पवार यांच्यासह मतदानाला https://t.co/eIKj4Eop7R #AssemblyElections2019 @supriya_sule pic.twitter.com/xeupKOoLER
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”गडचिरोलीत सखी मतदान केंद्र ” date=”21/10/2019,8:09AM” class=”svt-cd-green” ]
#महाराष्ट्रविधानसभानिवडणूक#यवतमाळ येथील गेडामनगर #सखी मतदान केंद्रावर महिला मतदारांचे स्वागत करतांना निवडणूक अधिकारी.#चलामतदानकरूया pic.twitter.com/AEQbjmA6zh
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”राधाकृष्ण विखे पाटील यांचं सहकुटुंब मतदान” date=”21/10/2019,8:01AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]
[svt-event title=”रावसाहेब दानवे यांचं सहकुटुंब मतदान” date=”21/10/2019,7:55AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]
[svt-event title=”शिवेंद्रराजे भोसले यांचं औक्षण” date=”21/10/2019,7:50AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]
[svt-event title=”सांगलीतील इस्लामपूरमध्ये मतदानयंत्रात बिघाड” date=”21/10/2019,7:49AM” class=”svt-cd-green” ] सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदान केंद्रावर मतदानयंत्रात बिघाड, इस्लामपूर मतदारसंघातील साखराळे गावातील मतदान केंद्र क्रमांक 63 वर मतदान यंत्रात बिघाड, 35 मिनिटे उलटूनही मतदान सुरु नाही [/svt-event]
[svt-event title=”अभिनेते अतुल कुलकर्णी सपत्नीक मतदानाला” date=”21/10/2019,7:40AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | अभिनेते अतुल कुलकर्णी यांचं पत्नी गीतांजली यांच्यासह मतदान https://t.co/eIKj4Eop7R #AssemblyElections2019 pic.twitter.com/YzVggR1DLn
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”धनंजय मुंडेंच्या नावे व्हायरल क्लिप तपासा : अजित पवार” date=”21/10/2019,7:14AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क https://t.co/eIKj4Eop7R @AjitPawarSpeaks #AssemblyElections2019 pic.twitter.com/SvV4OUAiM8
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”मतदारांनी योग्य पक्ष निवडावा : उदयनराजे ” date=”21/10/2019,7:10AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | उदयनराजे यांनी बजावला मतदानाचा हक्क https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/QkKUzkLy8G
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”‘नोटा’वर आमचा विश्वास नाही : मोहन भागवत” date=”21/10/2019,7:09AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | सरसंघचालक मोहन भागवत यांचं मतदान https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/N6Qk546Cc3
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”आशिष शेलार यांचं मतदान” date=”21/10/2019,7:06AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | भाजप नेते आशिष शेलार यांचं मतदान https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/LyZKp6TfgK
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मराठीतून ट्वीट, मतदानाचं आवाहन” date=”21/10/2019,7:04AM” class=”svt-cd-green” ]
आज महाराष्ट्राची जनता पुढील पाच वर्षे कोणाला सरकार चालविण्याची संधी द्यायची हे ठरविणार आहेत.
तेव्हा महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू-भगिनी विशेषत: माझ्या तरुण मित्रांना माझे आवाहन आहे की, आज विक्रमी संख्येने मतदान करून लोकशाहीचा हा उत्सव समृद्ध करावा!
— Narendra Modi (@narendramodi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”मतदानाला सुरुवात” date=”21/10/2019,7:00AM” class=”svt-cd-green” ]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : राज्यभरात मतदानाला सुरुवात, सर्वसामान्य मतदारांसह दिग्गज मतदानकेंद्राबाहेर रांगेत https://t.co/pBbBn0Xdyw pic.twitter.com/7gat39jQR4
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”अजित पवार मतदानासाठी रवाना” date=”21/10/2019,6:56AM” class=”svt-cd-green” ]
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार मतदानासाठी मतदानकेंद्राबाहेर हजर, पाहा क्षणोक्षणीचे लाईव्ह अपडेट https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/4aFxDG5aZg
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”उदयनराजे योग्य पक्षात, मातोश्रींची प्रतिक्रिया” date=”21/10/2019,6:52AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | सातारा : उदयनराजे यांच्या मातोश्री लाईव्ह, उदयनराजे योग्य पक्षात गेल्याची जनतेची भावना, भरभराटच होणार, भवानीमातेच्या दर्शनानंतर उदयनराजेंच्या मातोश्रींची प्रतिक्रिया, पाहा क्षणोक्षणीचे लाईव्ह अपडेट https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/APY69jFSLD
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”उदयनराजे भवानीमातेच्या दर्शनेला” date=”21/10/2019,6:52AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | सातारा : मतदानाआधी उदयनराजे देवदर्शनाला, सातारा पोटनिवडणुकीत रंगतदार लढत, पाहा क्षणोक्षणीचे लाईव्ह अपडेट https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/adcXB5UM4i
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”मतदानाला अवघ्या काही मिनिटांत सुरुवात” date=”21/10/2019,6:00AM” class=”svt-cd-green” ] राज्यभरातील 288 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया सुरु होण्यास अवघा एक तास बाकी आहे. [/svt-event]
राज्यभरात सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील भाग असल्यामुळे सकाळी 7 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंतच मतदान होईल
ऑक्टोबर 2014 मध्ये अस्तित्वात आलेल्या 13 व्या विधानसभेचा कालावधी 9 नोव्हेंबर 2019 रोजी संपणार आहे. गेल्या 50 वर्षात पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. भाजप-शिवसेना-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना-शिवसंग्राम यांची महायुती, काँग्रेस-राष्ट्रवादी-बहुजन विकास आघाडी-शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना-समाजवादी पक्ष यांची महाआघाडी, मनसे, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, आप यासारख्या पक्षांच्या दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
21 सप्टेंबरला आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यभर चार आठवडे प्रचाराचा धुरळा उडाला. भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभांचा धडाका लावला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह हेसुद्धा प्रचाराच्या मैदानात उतरले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राज्यभर दौरे घेत प्रचाराचा झंझावात केला. शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढत आपण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असल्याचं दाखवून दिलं. सोबतच सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील, अमोल कोल्हे यांच्या सभांचा नजराणा होताच. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांनी बाजू सावरून धरली, तरी राहुल गांधी यांच्या दोन सभा वगळता गांधी घराण्याची अनुपस्थिती जाणवत राहिली.
हेही वाचा : विधानसभा निवडणूक : मतदानासाठी मुंबई सज्ज, बंदोबस्तासाठी 40 हजार पोलीस तैनात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या भाषणाने मैदान गाजवलं. भाजपपासून शिवसेनेपर्यंत सर्वांवर राज ठाकरे यांनी टीकेची झोड उठवली. तर एमआयएम प्रमुख असदुद्दिन ओवेसी, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबडेकर यांनीही लोकसभा निवडणुकीत मिळालेला प्रतिसाद पाहून सत्ता खेचून आणण्यासाठी यथोचित प्रयत्न केले. आप स्वबळावर मैदानात उतरली असली, तरी पक्षाध्यक्ष मात्र महाराष्ट्रात सभा घेताना दिसले नाहीत.
प्रचारादरम्यान कुठे परस्परविरोधी उमेदवारांनी एकमेकांना मत देण्याचं खेळीमेळीत आवाहन झालं, तर कुठे समर्थक एकमेकांना भिडून राडेबाजी झाली. काही दिग्गज नेत्यांनी जीभ सैल सोडल्यामुळे प्रचाराने खालची पातळी गाठली. पैलवान, टोपणनावं ही प्रचाराची थीम होती, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. निवडणुकांच्या तोंडावर विक्रमी राजकीय पक्षबदल झाल्यामुळे उमेदवारांची पळवापळवी पाहायला मिळाली. सोबत नाराजांनी डोकं वर काढल्यामुळे बंडखोरीही मोठ्या प्रमाणावर झाली.
हेही वाचा : मतदारांची संख्या, मतदान केंद्र ते ओळखपत्र, निवडणुकीची A टू Z माहिती
पक्षनिहाय उमेदवार
बसप – 262 भाजप – 164 काँग्रेस – 147 शिवसेना – 126 राष्ट्रवादी – 121 मनसे – 101 भाकप – 16 माकप – 8 इतर पक्ष – 892 अपक्ष – 1400
महत्त्वाचे उमेदवार
देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आदित्य ठाकरे, अजित पवार, रोहित पवार, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, राम शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, प्रणिती शिंदे, नितेश राणे, छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन,
2014 मध्ये झालेल्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल
• भाजप – 122 • शिवसेना – 63 • काँग्रेस – 42 • राष्ट्रवादी – 41 • बविआ – 03 • शेकाप – 03 • एमआयएम – 02 • वंचित/भारिप – 01 • माकप – 01 • मनसे – 01 • रासप – 01 • सपा – 01 • अपक्ष – 07 • एकूण – 288
सर्वात जास्त उमेदवार असलेला मतदारसंघ – नांदेड दक्षिण (38)
सर्वात कमी उमेदवार असलेला मतदारसंघ – चिपळूण (3)
क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान मतदारसंघ – धारावी (मुंबई)
क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा मतदारसंघ – अहेरी (गडचिरोली)
लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान मतदारसंघ – वर्धा (2 लाख 77 हजार 980 मतदार)
लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा मतदारसंघ – पनवेल (5 लाख 54 हजार 827 मतदार)
मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र
• मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक.
• भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल अशावेळी पुढील अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल.
1. पासपोर्ट (पारपत्र)
2. वाहन चालक परवाना
3 छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र)
4. छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबूक
5. पॅनकार्ड
6. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड
7. मनरेगा जॉबकार्ड
8. कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड
9. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज
10. खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र
11. आधारकार्ड
मतदान केंद्राची माहिती अशी मिळवा
• मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध • या संकेतस्थळावर स्वतःची संपूर्ण माहिती नमूद केल्यास माहितीचा शोध घेता येतो. माहिती भरताना नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या बाबींचा समावेश करावा. मतदार ओळख क्रमांक व राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याची दुसरी सुविधाही या संकेतस्थळावर आहे.
एकूण मतदार
• महाराष्ट्रात पुरुष, महिला, तृतीयपंथी, दिव्यांग असे एकूण 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार. •पुरुष मतदार – 4 कोटी 68 लाख 75 हजार 750 •महिला मतदार – 4 कोटी 28 लाख 43 हजार 635 •तृतीयपंथी मतदार – 2 हजार 634
यापैकी
•दिव्यांग मतदार – 3 लाख 96 हजार •अनिवासी भारतीय – 5560 •निवडणूक सेवेतील मतदार- 1 लाख 17 हजार 581
मतदारांचा वयोगट
18 ते 25 – 1,06,76,013 25 ते 40 – 3,13,13,396 40 ते 60 – 3,25,39,026 60 पेक्षा जास्त – 1,51,93,584
मतदान केंद्रे
मतदान केंद्रे – 96 हजार 661 मुख्य मतदान केंद्रे – 95, 473 सहायक मतदान केंद्रे – 1,188 सखी मतदान केंद्रे – 352. महिलांसाठी, महिलांकडून संनियंत्रण आणि व्यवस्थापनावर भर
मतदान यंत्र (ईव्हीएम) – 1 लाख 79 हजार 895 नियंत्रण केंद्रे (कंट्रोल युनिट) – 1 लाख 26 हजार 505 व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रे – 1 लाख 35 हजार 21
उमेदवार
उमेदवार – 3 हजार 237 पुरुष उमेदवार – 3001 महिला उमेदवार – 235 तृतीयपंथी उमेदवार – 1
विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे 6.50 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच शांततेत, निर्भयपणे आणि पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.
मतदारांसाठी सोई-सुविधा
• किमान अत्यावश्यक सुविधांमध्ये पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, ब्रेल भाषेतील मतपत्रिका, शौचालय, दिव्यांग मित्र आदी सर्व किमान सुविधा • दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदवणे यासाठी PwD ॲपची सुविधा • सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग तसेच वयोवृद्ध मतदारांसाठी व्हीलचेअर आणि रॅम्पची व्यवस्था • दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी वेगळ्या रांगेची व्यवस्था. • अंध मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्रांवरील सूचनाफलक आणि मतदार यादी, ब्रेल लिपीमध्ये. मतदान यंत्रावर ब्रेल लिपी मुद्रीत केली असल्याने त्यांना कोणाच्याही मदतीखेरीज मतदान करता येणे शक्य. • लहान मुलासह मतदानास येणाऱ्या महिला मतदारांच्या मुलांसाठी पाळणाघराची व्यवस्था • ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना सोयीसाठी पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावरील सुमारे 5400 मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरीत. • पहिल्या वा दुसऱ्या मजल्यावर असलेल्या मतदान केंद्रासाठी लिफ्टची व्यवस्था
मतदारांच्या सुविधेसाठी
• आचारसंहितेसंबंधात तक्रारी करण्यासाठी सी-व्हिजील ॲपची सुविधा उपलब्ध. • ईव्हीएम व्हीव्हीपॅट वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या नियंत्रणासाठी GPS Tracking App, • मतदारांच्या मदतीसाठी ‘व्होटर हेल्पलाईन-1950.’ या क्रमांकावर एसएमएस करून मतदारांना माहिती मिळवता येईल. • मतदारांसाठी ‘व्होटर हेल्पलाईन ॲप’ही सुरु. • दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी PwD ॲपची सुविधा.
यंत्रणा सज्ज
विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र (बॅलेट युनिट) आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट) तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रे पुरवण्यात आली आहेत. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे 6.50 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दलही सज्ज आहे.
संबंधित इंटरेस्टिंग बातम्या :
विधानसभा निवडणूक 2019 : महाराष्ट्रातील 40 लक्षवेधी लढती
विधानसभेसाठी तळ्यातून मळ्यात, तिकीट मिळालेले आयाराम गयाराम