विधानसभा निवडणूक 2019 | 21 ऑक्टोबरला मतदान, 24 ऑक्टोबरला मतमोजणी
विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलेलं आहे. विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित केेलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा (Maharashtra Assembly Election Announcement) जाहीर केल्या आहेत. यासोबतच दोन्ही राज्यांत आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
महाराष्ट्रातील 288 आणि हरियाणातील 90 विधानसभेच्या जागांसाठी निवडणुकांचं वेळापत्रक घोषित करण्यात आलं. दोन्ही राज्यांत एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बरोबर एक महिन्याने म्हणजेच 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे, तर धनत्रयोदशीच्या आदल्याच दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबरला निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत.
Maharashtra Assembly Election | आचारसंहिता म्हणजे नेमकं काय?
महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी, तर हरियाणामध्ये 1.28 कोटी मतदार आहेत. राज्यात 1.84 लाख ईव्हीएम मतदान प्रक्रियेत वापरली जातील. प्रत्येक ठिकाणी पाच व्हीव्हीपॅट स्लिप मोजल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाच्या तारखा
अधिसूचना जारी करण्याची तारीख – शुक्रवार 27 सप्टेंबर 2019 नामांकन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख – बुधवार 4 ऑक्टोबर 2019 अर्जाची छाननी – गुरुवार 5 ऑक्टोबर 2019 अर्ज मागे घेण्याची तारीख – शनिवार 7 ऑक्टोबर 2019 मतदान – सोमवार 21 ऑक्टोबर 2019 मतमोजणी – गुरुवार 24 ऑक्टोबर 2019
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष सुरक्षा पथक गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात तैनात असणार आहे. तर सर्व पोलिंग बूथवर सीसीटीव्हीची नजर असेल. दिव्यांग आणि वृद्धांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
मुंबई आणि सहकारी बँकांवर निवडणूक आयोगाची विशेष नजर असेल. महाराष्ट्रामध्ये दोन विशेष अधिकारी खर्च सीमेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाठवण्यात येणार आहेत. उमेदवारांना प्रत्येकी 28 लाख रुपये खर्चाची मुदत देण्यात आली आहे. उमेदवारांना तीस दिवसांचा हिशेब निवडणूक आयोगाला द्यावा लागणार आहे.
प्रचारकाळात सोशल मीडिया आणि फेसबुकवर संपूर्ण नियंत्रण असणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी एक पथक महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे.
प्रचारामध्ये प्लास्टिकच्या वापराला बंदी घालण्यात आली आहे. पर्यावरणस्नेही सामग्रीचा वापर करणं उमेदवारांना बंधनकारक करण्यात आलं आहे.
सातारा पोटनिवणूक आताच नाही
राष्ट्रवादीच्या तिकीटावर साताऱ्यातून खासदारपदी निवडून आलेल्या उदयनराजे भोसले यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे सातारा लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे, मात्र त्याची मतदान प्रक्रिया महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसोबत होणार नाही.
2014 मध्ये झालेल्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल
- भाजप – 122
- शिवसेना – 63
- काँग्रेस – 42
- राष्ट्रवादी – 41
- बविआ – 03
- शेकाप – 03
- एमआयएम – 02
- वंचित/भारिप – 01
- माकप – 01
- मनसे – 01
- रासप – 01
- सपा – 01
- अपक्ष – 07
- एकूण – 288
2014 मध्ये विभागनिहाय कोणाला किती जागा मिळाल्या होत्या?
पश्चिम महाराष्ट्र (70) – भाजप 24, शिवसेना 13, काँगेस 10, राष्ट्रवादी 19, इतर 04
विदर्भ (62) – भाजप 44, शिवसेना 04, काँगेस 10, राष्ट्रवादी 01, इतर 03
मराठवाडा (46) – भाजप 15, शिवसेना 11, काँगेस 09, राष्ट्रवादी 08, इतर 03
कोकण (39) – भाजप 10, शिवसेना 14, काँगेस 01, राष्ट्रवादी 08, इतर 06
मुंबई (36) – भाजप 15, शिवसेना 14, काँगेस 05, राष्ट्रवादी 00, इतर 02
उत्तर महाराष्ट्र (35) – भाजप 14, शिवसेना 07, काँगेस 07, राष्ट्रवादी 05, इतर 02
एकूण (288) – भाजप 122, शिवसेना 63, काँगेस 42, राष्ट्रवादी 41, इतर 20
[svt-event title=”विधानसभा निवडणूक महत्त्वाच्या तारखा” date=”21/09/2019,12:24PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान, 24 ऑक्टोबरला मतमोजणी [/svt-event]
[svt-event title=”पोलिंग बूथवर सीसीटीव्हीची नजर” date=”21/09/2019,12:21PM” class=”svt-cd-green” ] विशेष सुरक्षा पथक गडचिरोली आणि गोंदिया जिल्हात असणार, सीसीटीव्हीची नजर सर्व पोलिंग बूथवर [/svt-event]
[svt-event title=”खर्चसीमेवर विशेष नजर” date=”21/09/2019,12:20PM” class=”svt-cd-green” ] मुंबई आणि सहकारी बँकांवर विशेष नजर असेल, महाराष्ट्रामध्ये दोन विशेष अधिकारी खर्च सीमेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाठवण्यात येणार [/svt-event]
[svt-event title=”प्रचारात प्लास्टिकबंदी” date=”21/09/2019,12:17PM” class=”svt-cd-green” ] प्रचारामध्ये प्लास्टिकच्या वापराला बंदी घातली असून पर्यावरणस्नेही सामग्रीचा वापर करावा लागेल [/svt-event]
[svt-event title=”उमेदवारी अर्जाबाबत नवा नियम” date=”21/09/2019,12:15PM” class=”svt-cd-green” ] उमेदवारी अर्जात एकही रकाना रिकामा राहिल्यास नामांकन अर्ज रद्द, उमेदवाराला 28 लाख रुपये खर्चाची मुदत, उमेदवारांना तीस दिवसांचा हिशेब द्यावा लागणार [/svt-event]
[svt-event title=”आचारसंहिता लागू” date=”21/09/2019,12:14PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये आदर्श आचारसंहिता लागू [/svt-event]
[svt-event title=”मतदारांची संख्या” date=”21/09/2019,12:06PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी, तर हरियाणामध्ये 1.28 कोटी मतदार [/svt-event]
[svt-event date=”21/09/2019,12:05PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्रातील 288, हरियाणातील 90 जागांवर निवडणूक होणार [/svt-event]
[svt-event title=”निवडणूक आयोग पत्रकार परिषद” date=”21/09/2019,12:02PM” class=”svt-cd-green” ]
LIVE : निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद https://t.co/ju0a0r3kDL
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 21, 2019
[/svt-event]
[svt-event date=”21/09/2019,9:08AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]
विधानसभा निवडणुकांचा हंगाम सुरु झाला असून राजकीय नेत्यांसह सर्वसामान्य मतदारांना निवडणुकांचे वेध लागले आहेत. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली. अंदाजानुसार संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
दिवाळी 25 ऑक्टोबरला असल्यामुळे त्यापूर्वीच मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याकडे निवडणूक आयोगाचा कल होता. मंत्रिमंडळ अस्तित्वात येण्यासाठी मात्र दिवाळीनंतरचा मुहूर्त लागेल.
महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. निवडणुकांसाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांसह सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. शिवसेना-भाजप युतीमध्ये लढणार असल्याचं सांगत असले तरी अंतिम निर्णय झालेला नाही. दोन्ही पक्षांकडून स्वबळाची चाचपणी सुरु आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असून, दोन्ही पक्ष 125-125 जागा लढवणार आहेत. तर मित्रपक्षांना 38 जागा सोडण्यात येणार आहेत.
2014 ची निवडणूक
2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा सप्टेंबर महिन्यातच आचारसंहिता लागू झाली होती. 12 सप्टेंबर रोजी आचारसंहिता लागली होती आणि 15 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. तर 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडली होती.