शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी उद्या दुपारी तीन वाजता राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली
Follow us
| Updated on: Nov 15, 2019 | 12:37 PM

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा जवळपास सुटण्याच्या मार्गावर दिसत आहे. कारण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ‘महासेनाआघाडी’ सत्तास्थापनेचा दावा करणार का, (Mahasena Aghadi to meet Governor) असा प्रश्न निर्माण होत आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी उद्या (शनिवारी) दुपारी तीन वाजताची वेळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मागितल्याची माहिती आहे. राजभवनावर तिन्ही पक्षांकडून नेमके कोणते नेते जाणार, हे अद्याप स्पष्ट नाही. तिन्ही पक्षाचे नेते उघडपणे एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ असेल.

या भेटीत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तास्थापनेचा दावा करणार की अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदतीबाबत मागणी करणार, हे समजलेलं नाही. भाजपचे विधीमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आजच सकाळी याबाबत राज्यपालांची भेट घेतली होती.

दरम्यान, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महासेनाआघाडीच्या पहिल्या समन्वय बैठकीत खातेवाटपांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची काल पहिली समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्तास्थापनेसाठी आवश्यक किमान सामायिक कार्यक्रमाचा मसुदा तयार केल्याचं बोललं जातं.

महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाची भूमिका जाहीर केली आहे. मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेकडेच असेल, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वारंवार सांगितलं आहे. मात्र अन्य मंत्रिपदांची वाटणी कशी करायची याबाबत समन्वय बैठकीत चर्चा झाली.

‘महासेनाआघाडी’विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिन्ही पक्षांनी 14-14-12 असं मंत्रिपदाचं सूत्र ठरवलं आहे. सध्या चर्चेत असलेल्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह 14 मंत्रिपदे, राष्ट्रवादीला 14 आणि काँग्रेसला 12 मंत्रिपदे मिळण्याचे संकेत आहेत. दोन्ही पक्षांना उपमुख्यमंत्रिपदेही मिळतील.

महत्त्वाची खाती सर्वांच्या वाट्याला

महत्वाची चार खाती प्रत्येक पक्षाला वाटून देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागाशी संबंधित खाती प्रत्येकी एका पक्षाच्या वाट्याला येऊ शकतात. त्यानुसार गृह, अर्थ, उद्योग एका पक्षाकडे असण्याची शक्यता आहे. तर महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि ऊर्जा दुसऱ्या पक्षाकडे असण्याची शक्यता आहे.

नगरविकास, जलसंपदा, MSRDC तिसऱ्या पक्षाला दिलं जाण्याची चिन्हं आहेत. तर ग्रामीण भागाची कृषी, सहकार, ग्रामविकास ही खाती प्रत्येकी एका पक्षाला मिळू शकतात.

राष्ट्रपती राजवट

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शिफारशीनंतर महाराष्ट्रात अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. सत्तास्थापन करण्यात मोठे पक्ष असमर्थ ठरल्याने राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यानंतर 12 नोव्हेंबर संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.

Mahasena Aghadi to meet Governor

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.