महासेनाआघाडीच्या किमान समान कार्यक्रमातले सहा EXCLUSIVE मुद्दे
'टीव्ही 9 मराठी'च्या हाती महासेनाआघाडीच्या किमान समान कार्यक्रमातले सहा EXCLUSIVE मुद्दे लागले आहेत.
नवी दिल्ली : “शिवसेनेसोबत सत्तास्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आज किमान समान कार्यक्रम निश्चित होईल. सरकार स्थापनेबाबतची चर्चा येत्या दोन ते तीन दिवसात संपेल”, अशी एक्स्क्लुझिव्ह माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली. मात्र महाराष्ट्रात ‘महासेनाआघाडी’ सरकार सत्तेत येत असल्यास किमान समान कार्यक्रमात नेमके कोणते मुद्दे (MahaSenaAghadi Common Minimum Program) असणार, याकडे जनतेचं लक्ष लागलेलं आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हातमिळवणी करत महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जातं. त्यासंदर्भात दिल्लीत भेटीगाठी आणि बैठकांचं सत्र सुरु आहे. मात्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून 25 दिवस उलटून गेले, तरीही सत्तास्थापन न झाल्यामुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती महासेनाआघाडीच्या किमान समान कार्यक्रमातले सहा EXCLUSIVE मुद्दे लागले आहेत.
महासेनाआघाडीच्या किमान समान कार्यक्रमातले महत्त्वाचे मुद्दे (MahaSenaAghadi Common Minimum Program)
1. शेतकऱ्यांची कर्जमाफी, सातबारा कोरा करणार ही शिवसेनेची भूमिका
2. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पात वेगानं काम करण्याचा विचार
3. राज्य सरकारची वित्तीय तूट कमी करण्यासाठी आर्थिक नियोजन
4. सावकारी कर्जातून शेतकऱ्यांची मुक्तता
5. विजेच्या दरात कपात
6. रोजगाराची संख्या वाढवणे, जास्तीत जास्त रोजगार द्यायचा प्रयत्न
दरम्यान, शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळाची माहिती देणार आहेत. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आज संध्याकाळी दिल्लीत बैठक होत आहे.
शरद पवार EXCLUSIVE : शिवसेनेसोबत सत्तास्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सरकार – संजय राऊत
अनेक दिवसांपासून खोळंबलेला सत्तास्थापनेचा प्रश्न डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुटेल आणि शिवसेनेच्या नेतृत्वात एक मजबूत लोकप्रिय सरकार स्थापन होईल, असा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. तसंच उद्यापर्यंत (21 नोव्हेंबर) सत्तेचं चित्र स्पष्ट होईल, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, याचाही पुनरुच्चार केला.
MahaSenaAghadi Common Minimum Program